सर्वप्रथम..या लेखमालेच्या सर्व वाचक,प्रतिसादक्,सहभागितांचे मनापासून धन्यवाद.
आणि याच भागातलं हे गीत (मुरलीधर घनःश्याम सुलोचन..)आपल्या सर्वांना ऐकण्यासाठी लावतो.
<iframe width="640" height="360" src="https://www.youtube.com/embed/LcQOpqMLgqo?feature=player_embedded" frameborder="0" allowfullscreen></iframe>
==========================================================
मी जेंव्हा ही लेखमाला लिहायला घेतली. तेंव्हा असं वाटलं होतं.की ४/५ भागात हे संपेल. फार तर दहा भाग होतील. कारण,त्यावेळी फक्त एक कथानायक निवडून त्याला मध्यवर्ती करून ह्या व्यवसायाचं अंतरंग खुलवावं.यातल्या गमतीजमती सांगाव्या,एव्हढाच माफक उद्देश होता. पण तो ही पूर्ण होता होता,१७ भाग झाले. पुढे काहि लिहिण्याचं माझ्या मनातंही नव्हतं. परंतू एकेदिवशी माझ्या नगरच्या वेदपाठशाळेतल्या,सोलापुरी मित्राचा फोन आला..(ह्ये बेणं मारवाडी ब्राम्हण हाय्,आणि...अट्टल गोडखाऊ आहे येक नंबरच!
) "पर्या आबे, काय करतोय बे...?,मी पर्वा यायलोय पुण्याला. तू हाएस ना? ..त्ये गेल्या वेळेसच्या ठिकाणी रबडी खायला जाऊ की बे..."
. आणि झालं मग! . माझा पाठशाळेचा अख्खा नॉश्टेलजिया भायीर आला. नगरच्या
शाळेपासून ते पुण्याच्या पाठशाळेपर्यंत सगळी फिलिम डोळ्यापुढे सरकायला
लागली. आणि तिच्याबरोबर माझ्या अजोळी म्हणजे,हरिहरेश्वरला..अगदी लहानपणी मे
महिन्यात सुट्टीला गेलेलो असतानाचा 'वे.मू.सितारामका जोशी ' यांचा आंगणात २
विद्यार्थांना संथा देतानाचा सीनंही त्यात मिसळला... ह्या सगळ्याची मिळून
एक गोळी तयार झाली,आणि ती वेदपाठशालीन जीवन चित्रीत होण्यात रुपांतरीत
झाली. मग मी मनात उभारलेल्या ह्या कोकणातल्या वेदपाठशाळेला..पुण्यात
व्यवसाय करत असतानाचे ,कोकणातल्याच इतर पुरोहित मित्रमंडळींचे सांगितलेले
अनुभवांचे खांब येऊन जोडले गेले. त्यात मी स्वतः अगदी पहिली दुसरी पासून
..दर मे महिन्याची सुटी,ही अजोळी हरेश्वरला यथेच्छ उपभोगली
असल्यामुळे...त्या मनाच्या भट्टीत भाजल्या गेलेल्या अस्सल विटांच्या आपोआप
भिंती झाल्या. मी ज्या ज्या पाठशाळांचे शिकविणारे अध्यापक-गुरुजी पाहिले
होते,त्यांची ती सगळी पद्धती रहाणीमान्,विचार/आचार,संस्कृती त्यात आली. आणि
माझ्या कथेतले मुख्य गुरुजी,काकू,सखारामकाका .. ही पात्र तर
कोकणभूमीमधल्या सर्वप्रकारच्या माणसांचं एकत्रित संस्करण आहे..असं समजलं
तरी चालण्यासारखं आहे. फक्त त्यांचा आत्मा, जो त्यात जाणवत गेलेला आहे,तो
मात्र मला लहानपणापासून माझ्या संपूर्ण रायगड जिल्ह्यात भेटलेल्या जवळच्या
व्यक्तिविशेषांचाच आहे. अश्या पद्धतीची माणसं,हा कोकणाच्या लालमातीचाच
संस्कार आहे,असं मी म्हटलं तर फार अतिशयोक्ती होणार नाही. 
तरिही आठरावा भाग लिहिताना त्याच्यापुढे, वेदपाठशाळेचं इतकं संपूर्ण चित्रण घडेल..अशी माझ्या मनाला अजिब्बात कल्पना नव्हती. पण त्या १८ आणि १९व्या भागात,मला जो काहि अतीशय उत्साह वाढवित नेणारा,आणि मनाला आशिर्वाद देणारा प्रतिसाद मिपाकरांकडून मिळाला,त्यातल्या वाक्यावाक्यामुळेच तर मी पुढे इतका लिहित गेलो...
याकरिता त्या सर्वांचे, आज ही छोटी विश्रांती घेताना, मनःपूर्वक आभार...
मी ह्या लेखमालेत कोकण हाच प्रांत कसा काय निवडला? आणि मी स्वतः कोकणातल्या एकाही पाठशाळेत शिकलो ,अगर गेलो नसलो,तरी हे चित्रण इतकं चांगलं कसं उमटलं? असा प्रश्न मला इथे व्य.नि.तून..आणि फेसबुकावरील असलेल्या माझ्या काहि क्लायंट्स कडूनंही विचारला गेलेला आहे.. त्याचं उत्तर इतकच की कोकणच्या लाल मातीवर माझं जबरदस्त प्रेम आहे. आजंही मला जर कुणी पुण्यातला व्यवसाय सोडून कुठे जाऊन स्थिरावलेलं अवडेल? असं विचारलं,तर माझ्या नकळत मी कोकणाचं नावं घेइन,इतकी त्या लालमातीची आणि तिथल्या निसर्गाची ,माणसांची माझ्या मनावर गडद दाट छाया पसरलेली आहे. म्हणूनच मला जरं का कुणी देवाचं पर्यायी नाव आजंही विचारलं , तर मी ते कोकण असं सांगतो.

आणि याच भागातलं हे गीत (मुरलीधर घनःश्याम सुलोचन..)आपल्या सर्वांना ऐकण्यासाठी लावतो.
<iframe width="640" height="360" src="https://www.youtube.com/embed/LcQOpqMLgqo?feature=player_embedded" frameborder="0" allowfullscreen></iframe>
==========================================================
मी जेंव्हा ही लेखमाला लिहायला घेतली. तेंव्हा असं वाटलं होतं.की ४/५ भागात हे संपेल. फार तर दहा भाग होतील. कारण,त्यावेळी फक्त एक कथानायक निवडून त्याला मध्यवर्ती करून ह्या व्यवसायाचं अंतरंग खुलवावं.यातल्या गमतीजमती सांगाव्या,एव्हढाच माफक उद्देश होता. पण तो ही पूर्ण होता होता,१७ भाग झाले. पुढे काहि लिहिण्याचं माझ्या मनातंही नव्हतं. परंतू एकेदिवशी माझ्या नगरच्या वेदपाठशाळेतल्या,सोलापुरी मित्राचा फोन आला..(ह्ये बेणं मारवाडी ब्राम्हण हाय्,आणि...अट्टल गोडखाऊ आहे येक नंबरच!
तरिही आठरावा भाग लिहिताना त्याच्यापुढे, वेदपाठशाळेचं इतकं संपूर्ण चित्रण घडेल..अशी माझ्या मनाला अजिब्बात कल्पना नव्हती. पण त्या १८ आणि १९व्या भागात,मला जो काहि अतीशय उत्साह वाढवित नेणारा,आणि मनाला आशिर्वाद देणारा प्रतिसाद मिपाकरांकडून मिळाला,त्यातल्या वाक्यावाक्यामुळेच तर मी पुढे इतका लिहित गेलो...
मी ह्या लेखमालेत कोकण हाच प्रांत कसा काय निवडला? आणि मी स्वतः कोकणातल्या एकाही पाठशाळेत शिकलो ,अगर गेलो नसलो,तरी हे चित्रण इतकं चांगलं कसं उमटलं? असा प्रश्न मला इथे व्य.नि.तून..आणि फेसबुकावरील असलेल्या माझ्या काहि क्लायंट्स कडूनंही विचारला गेलेला आहे.. त्याचं उत्तर इतकच की कोकणच्या लाल मातीवर माझं जबरदस्त प्रेम आहे. आजंही मला जर कुणी पुण्यातला व्यवसाय सोडून कुठे जाऊन स्थिरावलेलं अवडेल? असं विचारलं,तर माझ्या नकळत मी कोकणाचं नावं घेइन,इतकी त्या लालमातीची आणि तिथल्या निसर्गाची ,माणसांची माझ्या मनावर गडद दाट छाया पसरलेली आहे. म्हणूनच मला जरं का कुणी देवाचं पर्यायी नाव आजंही विचारलं , तर मी ते कोकण असं सांगतो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा