बुधवार, २४ सप्टेंबर, २०१४
यजमानांचे पान: यजमानांच्या पानावर आपले मनःपूर्वक स्वागत!
यजमानांचे पान: यजमानांच्या पानावर आपले मनःपूर्वक स्वागत!: यजमानांच्या पानावर आपले मनःपूर्वक स्वागत! हे पान आपल्या आणी आमच्या संवादासाठी तसेच महितीच्या देवाण-घेवाणी साठी आहे.आंम्ही आपल्याकडे...
गुरुवार, ३० जानेवारी, २०१४
गुरुजिंचे भावं विश्व! भाग-४
आणखि एक गमतीदार, चवदार, व लज्जतदार विषय. संपूर्ण विषय ऐकल्यावर,
यातल्या गमती कोणत्या? चव कोणती? लज्जत कोणती? आणी या गोष्टी चाखणार्यांची
नक्की दारं कोणती? हे न कळल्यामुळे तुमचीही अवस्था विधानसभे सारखी
त्रिशंकू होइल,यात शंका नाही.............
=============================
दुसरा नित्यताप म्हणजे पत्ता शोधणे...आणी त्यात आपल्या वाट्याला आलेलं शहर-पुणे! मी(ही) पुणेकर असलो तरी, काहि बाबतीत मी पुण्याला पुण्यपत्तन असं न म्हणता पुण्य पतन.. असच म्हणतो. पुण्यात पत्ता शोधणे म्हणजे स्वतःच अधःपतन करवून घेण्यासारखच आहे! इष्टस्थळी पोहोचल्यावर, यजमान सुद्धा आपल्या चेहेर्यावरून त्यांचा वड गाठायला गुरुजिंना किति फेरे घालायला लागलेत ते ओळखतात. पत्ता सांगण्याच्या निरनिराळ्या पद्धती पुण्यात आहेत. त्यातली सर्वात तापदायक पद्धत म्हणजे,सगळा पत्ता आपल्याकडून अस्सा काही काढून घेतात की आपल्यालाही पत्ता लागत नाही! यापेक्षा चोर पाकिट सुद्धा कमी शिताफिनी काढीत असावा. शेवटी आपण विचारवं, "कुठे येते मग ही इमारत?" तर, "अहो,मी सुद्धा या भागात नविन(?) आहे" असं आपल्याला निरित्तर करणारं उत्तर येतं! आपण पुन्हा प्रश्न विचारण्याचा गाढवपणा करावा, "का हो?..तुंम्ही नविन आहात या भागात..हा "भाग" तुमच्या ध्यानात नाही का आला?" तर पुन्हा यांचं उत्तर तयार, "त्याचं काय आहे माहितिये का? की म्हटलं होइल आपल्यालाही या भागाची माहिती!" हे उत्तर ऐकून डोक्याची शकलं झाल्यानंतर कडेनी जाणार्या एखाद्या ट्रकमागचं ते संत/महंत/विचारवंत-छाप बोधवचन मला दिसतं-"चित्ती असू द्यावे समाधानं!" ...
अता इतका ताप झाल्यानंतर माझं चित्त त्या तापानीच पूर्ण समाधानी होतं. आणी (एकदाचा) कळस गाठावा या इच्छेनी, मी त्याच दुष्ट ट्रक खाली देह ठेवायची इच्छा धरतो. पण पुण्यातले रस्ते आणी खड्डे पहाता, माझा देह(सरळ) वैकुंठाला न जाता, त्या ट्रक समोरच्या खड्ड्यात पडायचा आणी वरनं तो यमदूत तिथेही हुलकावणी देऊन जायचा! ... थोडक्यात..आमच्या नशिबी मरणाचं सुख ही सुखासुखी लाभायचं नाही!
याच दुसर्या तापाचा उपभाग किंवा पत्ता शोध शास्त्रानुभवानुसार वर्णन करायचं झालं तर पश्चात्ताप! तो पश्च्चात्तप कसा होतो पहा.. त्यातुन तुंम्ही धनकवडी सारख्या चक्रव्यूहात गेला असाल तर अभिमन्यूच्या उलट अवस्था वाट्याला आल्याशिवाय रहात नाही! (हा ताप अता मोबॉइलमुळे बराचसा नामशेष झाला आहे, पण जंतू अजुन मेलेले नाहीत!
)
आपणः- अहो ते दिग्विजय अपार्मेंट कुठाय हो! ह्या पोस्ट ऑफिस जवळच आहे.आपल्याला माहित आहे का?
टवाळ पोरांचं त्रिकूट:- ए पांग्या तुला म्हैत हे कारे अपारमेंट?
पांग्या:-मला कशाला ** घालायला म्हैत असल? मी अता मुंबईला अस्तो,इसरला का भाड्या!
(त्याच्यावर अता हा पहिला)-रंग्या:- आयच्या गावात...मुंबैला कदी पास्नं?
पांग्या:-तुला म्हैत नाय व्हय आपल्या बापानी फ्लॅट घिऊन दिला आपल्याला..आता तिकडच धंदा!
(इकडून आपण):- अहो म्हाइतीये का पत्ता?
रंग्या:-ओ काका... नक्की कोन्चा चौक सांगितला तुंम्हाला?
आपणः-अहो,हाच चौक सांगितला.पोश्ट ऑफिसचा..
(रंग्याला तोडून तिसरा संग्या चालू होतो) संग्या:- आओ काका, ते हितं नाय तिकडं गावठानातलं जुनं पोश्ट हे ना.. त्येच्या चौकात असल.. थांबा मी तुमाला दाखवतो!
असं म्हणून तो महान संग्या आपल्या गाडीवर बसून येतो.आणी जुन्या ऑफिस जवळ उतरून, "हितं कोन्ला बी इचारा..सांगल तुमाला" असं म्हणून जातो! नंतर पत्ता अजुनच तिसरीकडे सापडल्यावर आपल्याला कळतं की त्या "संग्या"ला वरच्या चौकात यायची हुक्की आली होती,म्हणून त्यानी आज आपल्याला एकंदरीत "चौक" दाखवला!
आणी अखेर मग एखादा टेलिफोन बुथ सापडून,त्या दिवशी मिळणारं धन-कवडी मोल करून,तो खर्या अर्थानी धनकवडी'तला पत्ता आपल्याला एकदाचा "मिळतो!"
तिसरा ताप हा कमी प्रमाणात अढळतो... पण तरिही त्याचं एकंदर प्रमाण पहाता तोच सगळ्यात जास्ती म्हणायला हवा. कारण हा मनुष्यरूपी छळवादी ताप आहे. ताप देणार्या अश्या,ऐतिहासिक पाषाणांचे भग्नावशेष पुण्यात अजूनही शिल्लक आहेत. यांचा संग्रह केला तर एक संग्रहालय राजा केळकरच्या बाजूला दिमाखात उभं राहिल,याची मला खात्री आहे.
(आमचा पक्या नावाचा एरवी शिविलाही न शिवणारा दोस्त या भग्नावशेषांना "जिवंत-शनैश्चर" अशी परिपूर्ण धार्मिक शिवी देतो.. ती या छळामुळेच!
)
त्यामुळे आपण बायकोविहिन असलो की मग आली कंबख्ती......
भग्नावशेषः-"अरे..गुरुजी का?..याही कपड्यात फिरता वाटतं?"
आंम्ही:- "आंम्हालाही तसच वाटतं!"
भग्नावशेषः-(कवळी सावरत..) "पण खुरुजिंनी कसं कायम धोत्रात असलं पाहिजे!"
आंम्ही:-" हो का??? बरोबरच आहे तुमचं. डॉक्टरनी देखिल दवाखाना झाल्यावर घरीदारी तो पांढरा कोट/टेथेस्कोप घालूनच फिरलं पाहिजे! नाही का?..त्याशिवाय त्याला काय स्कोप!?"
भग्नावशेषः-(कवळी उडवून-हॅ हॅ हॅ करत..) "अरे व्वा.. टेथेस्कोप/कोटाचं उदाहरण देऊन चांगलच "कोट" केलत की आंम्हाला... हॅ हॅ हॅ भेटू परत!"
आंम्ही:-(मनात.."असेच काय?" असे म्हणत) "ह्हं ह्हं ह्हं .. भेटू हो... या अता!" असे म्हणतो आणी रस्ता धरतो...
अता हाच प्रसंग,जेंव्हा पाठशाळा नावाच्या सर्वार्थानी-अज्ञाताच्या साळेतनं - सुटलेल्या एखाद्या तरुण, म्हणजे हल्लीच्या भाषेत "यं..ग" गुरुजिच्या बाबतीत घडतो तेंव्हा तो प्रसंग समरप्रसंगच! अता, हा धंद्यामधे दोन/चार वर्ष रुळावलेल्या आणी खाद्यधर्माचारशास्त्र याची नीट 'समज' आलेल्या गुरुजीचं मानस कसं व्यक्त होतं ते पहा..
"सारस बाग किंवा तत्सम ठिकाणी आपण आनंदात पावभाजी चाखित असतो. थम्सअप/आईस्क्रीम योग जुळून आलेला असतो. आजुबाजुला सृष्टीसौंदर्य बहरा'ला ऊत आलेला असतो. अश्या सौंदर्याला मी दुरुनच पाहातो, कारण (केवळ निरखण्यासाठी) थोडं जवळ जायचं धाडस केलं, की तो "बहर" बिब्ब्यासारखा उततो! (असा माझ्या मित्राचा अनुभव आहे!) त्याची व माझी कुंडली एकच आहे, म्हणून मी माझ्या कुंडलीवर हा कुंडलिनी प्रयोग करायला जात नाही... तर चाललं होतं काय..की, आजुबाजुला सृष्टीसौंदर्य बहरा'ला ऊत आलेला असतो. कडेनी डोसे/भेळ असे निरनिराळे वास आपला उरला सुरला श्वास रोखीत असतात. आपली पावभाजिही रंगात आलेली असते.
ते सुरु होतात..त्यांचं अण्णावंही 'ढेकणे' असं वगैरे अगदी स्वभाव सदृश असतं!
ढेकणे:- आँ... गुरुजी??? या कपड्यात??? इथं!? गुरुजिंच्या भुमिकेतून विचार करता "हे" पटतं का तुंम्हाला?
आंम्ही:-ढेकणे अजोबा...तुंम्हीही माणसाच्या भुमिकेतून विचार करा ना? असं विचारणं तुंम्हाला पटतं का ते!?
ढेकणे:-संपूर्ण पटतं?
आंम्ही:-कसं क्काय?
ढेकणे:-माणूस म्हणून मला तुंम्हाला काहि प्रश्न विचारण्याचा हक्क नाही का? (ह..क्क. वर जोर देऊन!)
आंम्ही:-आंम्हाला माणूस म्हणून जगण्याचाही हक्क नाही का?
ढेकणे:-आहे..पण तरी मी प्रश्न विचारणार
आंम्ही:-(छळ नुस्ता!) विचारा..पण मी प्रश्न पाहुन उत्तरं देणार!
ढेकणे:-असं का बरं?
आंम्ही:-आंम्ही तुमच्या घरी आल्यावर,"काय अजोबा तुंम्ही एव्हढे धार्मिक आणी जानवं नाही का गळ्यात?" असा प्रश्न केल्यावर तुंम्ही, "अहो,गुर्जी काळाप्रमाणे बदललं पाहिजे" (आंम्ही-मनात-"जानवं का?" हा प्रश्न दाबून!) असा नवा वेदांत आंम्हाला शिकवताच ना?
ढेकणे:-श्शूक..श्शूक..हळू बोला.आजुबाजुला लोक ऐकताहेत
आंम्ही:-का? का? अता का? तरी नशिब समजा. तुंम्ही जानवं देण्याबद्दल मला अकरा रुपये लाच दिल्याचं तुमच्या होम-मिनिस्टरना मी सांगितलं नाहिये अजून!
माझं हे वाक्य पूर्ण होइपर्यंत अजोबा गृहमंत्र्यांच्या भितिने सारस बागेतून पेशवे बागेत एका रिकाम्या पिंजर्यात जाऊन दडल्याचं नंतर कळलं मला! नशिब अंधारात सिंव्हाच्या पिंजर्यात नाही गेले!...... हे सिंव्हाचं नशिब... कारण यांनी त्याला ही ह्यांना खाईपर्यंत "तुला हे शोभतं का?" "चित्रगुप्ताकडे तक्रार करीन मी..की पुढचा जन्म मला रिंगमास्टरचा दे, आणी तुला पुन्हा सर्कशीत माझ्या चाबकाखाली ड्यूटिला पाठव!" असा प्रश्नांचा भडीमार करून त्या सिंव्हाचीही शेळी केली असती
धार्मिक कार्यक्रमाच्या दिवशी, यांच्या घरी केटरर कडून पायात चपला घालून आणलेलं(पार्सल) जेवण सोवळ्यात देवाला नैवेद्य दाखवून आंम्ही(ही) जेवतो.. हा काळानुसार केलेला बदल, ते कसा विसरले ते काही कळलं नाही.....!
=======================================
=============================
जखमे सारखंचिडचिडं करणारा सगळ्यात पहिला प्रकार म्हणजे, रस्त्यावरून येता-जाताना काहि कारणास्तव ब्रेक मारून थांबावं, तर काहि लोकं आंम्हाला नखं ते शिखेचा अंत होईपर्यंत न्याहाळतात. ह्यांच्या चेहेर्यावर अस्सा काहि भाव असतो की, आमच्या अंगावरचे कपडे, ते वरच्या खिशातलं मोबॉइल, देहाखालची गाडी, ह्या सर्व वस्तूंमधे भरलेला गुरुजी नामक देह त्या लायकीचाच नाहिये. किंवा हे सर्व आंम्ही चोरुन किंवा भाड्यानी आणून वापरतोय! "त्यापेक्षा जवळ येऊन एक जोडा मारा, पण हा नजरेचा बाण नको...'' असं ओरडावसं वाटतं.
दुसरा नित्यताप म्हणजे पत्ता शोधणे...आणी त्यात आपल्या वाट्याला आलेलं शहर-पुणे! मी(ही) पुणेकर असलो तरी, काहि बाबतीत मी पुण्याला पुण्यपत्तन असं न म्हणता पुण्य पतन.. असच म्हणतो. पुण्यात पत्ता शोधणे म्हणजे स्वतःच अधःपतन करवून घेण्यासारखच आहे! इष्टस्थळी पोहोचल्यावर, यजमान सुद्धा आपल्या चेहेर्यावरून त्यांचा वड गाठायला गुरुजिंना किति फेरे घालायला लागलेत ते ओळखतात. पत्ता सांगण्याच्या निरनिराळ्या पद्धती पुण्यात आहेत. त्यातली सर्वात तापदायक पद्धत म्हणजे,सगळा पत्ता आपल्याकडून अस्सा काही काढून घेतात की आपल्यालाही पत्ता लागत नाही! यापेक्षा चोर पाकिट सुद्धा कमी शिताफिनी काढीत असावा. शेवटी आपण विचारवं, "कुठे येते मग ही इमारत?" तर, "अहो,मी सुद्धा या भागात नविन(?) आहे" असं आपल्याला निरित्तर करणारं उत्तर येतं! आपण पुन्हा प्रश्न विचारण्याचा गाढवपणा करावा, "का हो?..तुंम्ही नविन आहात या भागात..हा "भाग" तुमच्या ध्यानात नाही का आला?" तर पुन्हा यांचं उत्तर तयार, "त्याचं काय आहे माहितिये का? की म्हटलं होइल आपल्यालाही या भागाची माहिती!" हे उत्तर ऐकून डोक्याची शकलं झाल्यानंतर कडेनी जाणार्या एखाद्या ट्रकमागचं ते संत/महंत/विचारवंत-छाप बोधवचन मला दिसतं-"चित्ती असू द्यावे समाधानं!" ...
अता इतका ताप झाल्यानंतर माझं चित्त त्या तापानीच पूर्ण समाधानी होतं. आणी (एकदाचा) कळस गाठावा या इच्छेनी, मी त्याच दुष्ट ट्रक खाली देह ठेवायची इच्छा धरतो. पण पुण्यातले रस्ते आणी खड्डे पहाता, माझा देह(सरळ) वैकुंठाला न जाता, त्या ट्रक समोरच्या खड्ड्यात पडायचा आणी वरनं तो यमदूत तिथेही हुलकावणी देऊन जायचा! ... थोडक्यात..आमच्या नशिबी मरणाचं सुख ही सुखासुखी लाभायचं नाही!
याच दुसर्या तापाचा उपभाग किंवा पत्ता शोध शास्त्रानुभवानुसार वर्णन करायचं झालं तर पश्चात्ताप! तो पश्च्चात्तप कसा होतो पहा.. त्यातुन तुंम्ही धनकवडी सारख्या चक्रव्यूहात गेला असाल तर अभिमन्यूच्या उलट अवस्था वाट्याला आल्याशिवाय रहात नाही! (हा ताप अता मोबॉइलमुळे बराचसा नामशेष झाला आहे, पण जंतू अजुन मेलेले नाहीत!
आपणः- अहो ते दिग्विजय अपार्मेंट कुठाय हो! ह्या पोस्ट ऑफिस जवळच आहे.आपल्याला माहित आहे का?
टवाळ पोरांचं त्रिकूट:- ए पांग्या तुला म्हैत हे कारे अपारमेंट?
पांग्या:-मला कशाला ** घालायला म्हैत असल? मी अता मुंबईला अस्तो,इसरला का भाड्या!
(त्याच्यावर अता हा पहिला)-रंग्या:- आयच्या गावात...मुंबैला कदी पास्नं?
पांग्या:-तुला म्हैत नाय व्हय आपल्या बापानी फ्लॅट घिऊन दिला आपल्याला..आता तिकडच धंदा!
(इकडून आपण):- अहो म्हाइतीये का पत्ता?
रंग्या:-ओ काका... नक्की कोन्चा चौक सांगितला तुंम्हाला?
आपणः-अहो,हाच चौक सांगितला.पोश्ट ऑफिसचा..
(रंग्याला तोडून तिसरा संग्या चालू होतो) संग्या:- आओ काका, ते हितं नाय तिकडं गावठानातलं जुनं पोश्ट हे ना.. त्येच्या चौकात असल.. थांबा मी तुमाला दाखवतो!
असं म्हणून तो महान संग्या आपल्या गाडीवर बसून येतो.आणी जुन्या ऑफिस जवळ उतरून, "हितं कोन्ला बी इचारा..सांगल तुमाला" असं म्हणून जातो! नंतर पत्ता अजुनच तिसरीकडे सापडल्यावर आपल्याला कळतं की त्या "संग्या"ला वरच्या चौकात यायची हुक्की आली होती,म्हणून त्यानी आज आपल्याला एकंदरीत "चौक" दाखवला!
आणी अखेर मग एखादा टेलिफोन बुथ सापडून,त्या दिवशी मिळणारं धन-कवडी मोल करून,तो खर्या अर्थानी धनकवडी'तला पत्ता आपल्याला एकदाचा "मिळतो!"
तिसरा ताप हा कमी प्रमाणात अढळतो... पण तरिही त्याचं एकंदर प्रमाण पहाता तोच सगळ्यात जास्ती म्हणायला हवा. कारण हा मनुष्यरूपी छळवादी ताप आहे. ताप देणार्या अश्या,ऐतिहासिक पाषाणांचे भग्नावशेष पुण्यात अजूनही शिल्लक आहेत. यांचा संग्रह केला तर एक संग्रहालय राजा केळकरच्या बाजूला दिमाखात उभं राहिल,याची मला खात्री आहे.
त्याचं होतं असं...दिवस-भराचं काम संपवून आपण घरी यावं,आणी वकिलानी काळा कोट उतरवावा,तसं आपण "तो" ड्यूटी'चा ड्रेस बदलून,जं.....रा डेक्कन जिमखान्यावरून फेरफटका मारत जावं, तर अस्सा एखादा नग समोर येतो की विचारू नका! यावेळी फिरायला जाताना..तो गुरुजी धोतरातनं शर्ट-प्यांट मधे शिरून माणसात आलेला असतो. त्यावेळी त्याचं "आयुष्य" हे तीन अंकी प्रायोगिक नाटक जर स्त्री-पात्र विरहीत असेल तर जास्तीचा ताप! जसं, आई/वडीलांच छत्र असेल तर अपत्याचा साडेसातीचा ताप 'निम्म्यानी कमी होतो' -- असं म्हणतात! तसच, शर्टप्यांटीतल्या गुरुजिला बायको हे अर्धांग त्याच्या पूर्णांगाबरोबर असेल..तर..त्या भग्नावशेषांचं त्याच्याकडे लक्ष गेलं तरी, बायकोची "छाया" पडल्यानी तो गुरुजी नामक ग्रह त्याला दिसत नाही. फक्त "याला कुठेतरी पाहिलाय" असा ग्रह करवून घेऊन तो भग्नावशेष नामशेष होतो... इत्यर्थे-टळतो, तेंव्हा ग्रहण सुटतं! स्वतःच्या छोट्या जगाचा गुरुजी नामक स्वामी बायको विना जर श्रीमंत असेल, तर ती श्रीमंती उपभोगताना हे भग्नावशेष त्याला भिकेला लावतात.
..की,
(आमचा पक्या नावाचा एरवी शिविलाही न शिवणारा दोस्त या भग्नावशेषांना "जिवंत-शनैश्चर" अशी परिपूर्ण धार्मिक शिवी देतो.. ती या छळामुळेच!
त्यामुळे आपण बायकोविहिन असलो की मग आली कंबख्ती......
भग्नावशेषः-"अरे..गुरुजी का?..याही कपड्यात फिरता वाटतं?"
आंम्ही:- "आंम्हालाही तसच वाटतं!"
भग्नावशेषः-(कवळी सावरत..) "पण खुरुजिंनी कसं कायम धोत्रात असलं पाहिजे!"
आंम्ही:-" हो का??? बरोबरच आहे तुमचं. डॉक्टरनी देखिल दवाखाना झाल्यावर घरीदारी तो पांढरा कोट/टेथेस्कोप घालूनच फिरलं पाहिजे! नाही का?..त्याशिवाय त्याला काय स्कोप!?"
भग्नावशेषः-(कवळी उडवून-हॅ हॅ हॅ करत..) "अरे व्वा.. टेथेस्कोप/कोटाचं उदाहरण देऊन चांगलच "कोट" केलत की आंम्हाला... हॅ हॅ हॅ भेटू परत!"
आंम्ही:-(मनात.."असेच काय?" असे म्हणत) "ह्हं ह्हं ह्हं .. भेटू हो... या अता!" असे म्हणतो आणी रस्ता धरतो...
अता हाच प्रसंग,जेंव्हा पाठशाळा नावाच्या सर्वार्थानी-अज्ञाताच्या साळेतनं - सुटलेल्या एखाद्या तरुण, म्हणजे हल्लीच्या भाषेत "यं..ग" गुरुजिच्या बाबतीत घडतो तेंव्हा तो प्रसंग समरप्रसंगच! अता, हा धंद्यामधे दोन/चार वर्ष रुळावलेल्या आणी खाद्यधर्माचारशास्त्र याची नीट 'समज' आलेल्या गुरुजीचं मानस कसं व्यक्त होतं ते पहा..
"सारस बाग किंवा तत्सम ठिकाणी आपण आनंदात पावभाजी चाखित असतो. थम्सअप/आईस्क्रीम योग जुळून आलेला असतो. आजुबाजुला सृष्टीसौंदर्य बहरा'ला ऊत आलेला असतो. अश्या सौंदर्याला मी दुरुनच पाहातो, कारण (केवळ निरखण्यासाठी) थोडं जवळ जायचं धाडस केलं, की तो "बहर" बिब्ब्यासारखा उततो! (असा माझ्या मित्राचा अनुभव आहे!) त्याची व माझी कुंडली एकच आहे, म्हणून मी माझ्या कुंडलीवर हा कुंडलिनी प्रयोग करायला जात नाही... तर चाललं होतं काय..की, आजुबाजुला सृष्टीसौंदर्य बहरा'ला ऊत आलेला असतो. कडेनी डोसे/भेळ असे निरनिराळे वास आपला उरला सुरला श्वास रोखीत असतात. आपली पावभाजिही रंगात आलेली असते.
आणी..अश्यावेळीभग्नावशेष "शेष" होऊन चावायला तिथं येतो! आवाज-रिक्षाच्या फुटक्या सायलेन्सर सारखा...चिरका! वय-(असलच तर!) सत्तरी ओलांडलेलं! हातात एक काठी! जिचा वापर स्वतःला आधार देण्यापेक्षा दुसर्याच्या सुखात व्यत्यय आणून, त्याला ढोसण्यासाठी किंवा तीचा धाक दाखवून "ढोस" देण्यापलिकडे नसतो.
ते सुरु होतात..त्यांचं अण्णावंही 'ढेकणे' असं वगैरे अगदी स्वभाव सदृश असतं!
ढेकणे:- आँ... गुरुजी??? या कपड्यात??? इथं!? गुरुजिंच्या भुमिकेतून विचार करता "हे" पटतं का तुंम्हाला?
आंम्ही:-ढेकणे अजोबा...तुंम्हीही माणसाच्या भुमिकेतून विचार करा ना? असं विचारणं तुंम्हाला पटतं का ते!?
ढेकणे:-संपूर्ण पटतं?
आंम्ही:-कसं क्काय?
ढेकणे:-माणूस म्हणून मला तुंम्हाला काहि प्रश्न विचारण्याचा हक्क नाही का? (ह..क्क. वर जोर देऊन!)
आंम्ही:-आंम्हाला माणूस म्हणून जगण्याचाही हक्क नाही का?
ढेकणे:-आहे..पण तरी मी प्रश्न विचारणार
आंम्ही:-(छळ नुस्ता!) विचारा..पण मी प्रश्न पाहुन उत्तरं देणार!
ढेकणे:-असं का बरं?
आंम्ही:-आंम्ही तुमच्या घरी आल्यावर,"काय अजोबा तुंम्ही एव्हढे धार्मिक आणी जानवं नाही का गळ्यात?" असा प्रश्न केल्यावर तुंम्ही, "अहो,गुर्जी काळाप्रमाणे बदललं पाहिजे" (आंम्ही-मनात-"जानवं का?" हा प्रश्न दाबून!) असा नवा वेदांत आंम्हाला शिकवताच ना?
ढेकणे:-श्शूक..श्शूक..हळू बोला.आजुबाजुला लोक ऐकताहेत
आंम्ही:-का? का? अता का? तरी नशिब समजा. तुंम्ही जानवं देण्याबद्दल मला अकरा रुपये लाच दिल्याचं तुमच्या होम-मिनिस्टरना मी सांगितलं नाहिये अजून!
माझं हे वाक्य पूर्ण होइपर्यंत अजोबा गृहमंत्र्यांच्या भितिने सारस बागेतून पेशवे बागेत एका रिकाम्या पिंजर्यात जाऊन दडल्याचं नंतर कळलं मला! नशिब अंधारात सिंव्हाच्या पिंजर्यात नाही गेले!...... हे सिंव्हाचं नशिब... कारण यांनी त्याला ही ह्यांना खाईपर्यंत "तुला हे शोभतं का?" "चित्रगुप्ताकडे तक्रार करीन मी..की पुढचा जन्म मला रिंगमास्टरचा दे, आणी तुला पुन्हा सर्कशीत माझ्या चाबकाखाली ड्यूटिला पाठव!" असा प्रश्नांचा भडीमार करून त्या सिंव्हाचीही शेळी केली असती
धार्मिक कार्यक्रमाच्या दिवशी, यांच्या घरी केटरर कडून पायात चपला घालून आणलेलं(पार्सल) जेवण सोवळ्यात देवाला नैवेद्य दाखवून आंम्ही(ही) जेवतो.. हा काळानुसार केलेला बदल, ते कसा विसरले ते काही कळलं नाही.....!
=======================================
गुरुजींचे भावं विश्व! भाग-२
त्या-मला ना...आमच्या मासिकासाठी तुमची मुलाखत हवी आहे? इथेच द्याल का?
हा कर्यक्रम संपल्यावर... सुशी ओरडणार नै कै मला...(ही त्यांची-
सुशी..म्हण्जे आमच्या यजमानांच्या सुविद्य पत्नी असतात..असं नंतरहून
आंम्हाला..त्यांचा(ही) सह भाग मुलाखतीत झाल्यानंतर कळतं..
=================================
त्या-(मुलाखतकार मोड ऑन) नमस्कार...धर्मसमाज मासिकातर्फे तुमचं स्वागत!
आंम्ही-(सर्व मोड ऑफ करून!!!) धन्यवाद
त्या-तुमचं नाव काय?
आंम्ही-आत्माराम सदाशिव बापट.
त्या-अय्या,बापट मंजे वासिष्ठगोत्री ना!?
आंम्ही-आपणंही एकंदरीत-आमच्याच(गोत्राच्या!) का?>(हा खरा मनात आलेला प्रश्न टाळून) हे मासिकात छापणार काय?
त्या-खि..खि..खि! नै हो,आपलं सहज विचारलं!
आंम्ही-(कर्म आमचे!) मग आता मुलाखतीतले विचारा.
त्या-हो..हो..,तर गेली किती वर्ष हे काम तुंम्ही करताय?
आंम्ही-(वैतागून) १४ वर्ष झाली,म्हणजे तुंमच्या साहित्तिक भाषेत १ वनंवास पुरा झाला. नै का?
त्या- ह्ही ह्ही ह्ही.. काय विनोद करता हो भटजी! अहो,वन वास काय? जनंवास तरी म्हणा.
आंम्ही-हॅ..हॅ..हॅ..एकंदरीत खरं बोल्ताय तुंम्ही. शब्दांवर(च) प्रभुत्व आहे तुमचं!
त्या-हो ना.अता या क्षेत्रात लागतच ठेवायला!
आंम्ही-बरोबर आहे,या(च) क्षेत्रात लागतं!
त्या-या व्यवसायातले तुमचे काही चांगले/वाइट अनुभव सांगा ना?
आंम्ही-वाइट अनुभव आलाच नै आजपर्यंत,हाच चांगला अनुभव म्हणायला हवा!
त्या-ह्हू..ह्हू..ह्हू..! असं टाळू नका हो,खरच सांगा ना?
आंम्ही-(अता नाही काही सांगितलं,तर आपल्या टाळू वरचे शिलकितले केसंही जातील या भयाने..) हम्म..आहे खरा एक चांगला अनुभव. एकदा एका यजमानांनी माझी छत्री मोडली म्हणून त्यांची त्यांन्नी मला दिली.(आणी नंतर उत्तरपूजेत फक्त नारळ'च दिला)असे समाजहितैशी यजमान-लाभणं,हा कित्ती चांगला अनुभव आहे? नै !?
त्या-अहो..अहो..व्वा,व्वा..काय सांगताय काय? त्या यजमानांचा पत्ता द्या ना? त्यांचीही मुलाखत घेइन म्हणते!
आंम्ही-(त्या खौट यजमानाची या खौटीकेकडून वैचारिक हत्या होणार,या आनंदात पत्ता/फोन देऊन..) हा घ्या,आणी उद्याच जा!
त्या- का हो?
आंम्ही-पर्वा..मला त्यांच्याकडे जायचय! (उत्तर पूजा वसूल करायला)
त्या-(गांगरून..) बरं बरं,अता एक(च) वाइट अनुभव सांगा.
आंम्ही-एकच सांगू???
त्या-हो..नै..म्हणजे पेज कव्हर होणर नै ना,म्हणून! नंतर उगाच एडीट होण्यापेक्षा अधीच "कमी" नेलेलं बरं!
आंम्ही-फारच हिशेबी मुलाखतकार दिस्ता आपण,हल्ली पहायला नै मिळत इतका हिशोबीपणा!
त्या-(आमच्या वक्तव्यातला उपरोध न समजल्यामुळे..) धन्यवाद हो भटजी...अता 'तो' वाइट अनुभव सांगा ना?
आंम्ही-पर्वा एका संस्कृती संरक्षक अजोबांबरोबर आम्चा जानव्यावरून वाद झाला.
त्या-काय जानव्या वरून वाद?
आंम्ही-हो ना..जानव्याच्या-वरूनच वाद झाला.
त्या-मंजे...त्यांच्याकडे जान्वं नव्हतं का?
आंम्ही-(आधीच्या वाक्यातले "ध्वनित" न कळलेल्या,या मुलाखितेची दया येऊन..) हो..हो..नव्ह्तं..नव्हतं जानवं त्यांच्याकडे.मग मला मागितलं..आणी चक्क हुज्जत घालायला लागले,की जानवं गुरुजींच्या पिशवीत एक्ष्ट्रा असायला हवच..म्हणून!
त्या-अय्या..आणी मं......?
आंम्ही-मंग काय..मी ही त्यांना म्हटलं,''देत नै ज्जा...!" हवं तर नवं घेऊन या जानवं.
त्या-(पुन्हा आ वासून) बरं..मं...?
आंम्ही-मी सूनावलं त्यांना,तुम्च माझ्याचकडे जानवं मागणं,हे सिग्नलवर धरलेल्या चालकानी-ट्रॅफिक इन्सपेक्टरकडे लायसन मागण्यासारखं आहे!
त्या-व्वा..! मुद्देसूद हो भटजी..आणी मं...?
आंम्ही-मं..काय? सांगितलं पुन्हा..."जा..नवं जानवं घेऊन या!" नैतं मी जातो.
त्या-ह्हू..ह्हू..ह्हू.. भटजी,तुंम्ही खर्रच विनोदी आहात हं! मग...गेलात तुंम्ही???
आंम्ही-(वेगळाच संशय येऊन..) अहो,गेलो कुठे(?)..आहे ना! फक्त त्यांच्या घरातून गेलो!
त्या-हम्म..ते कळ्ळं मला,पण छानच सांगितलेत हो अनुभव! कधी दक्षिणा कमी मिळण्याचा अनुभव येतो का?
आंम्ही-(त्यांच्या मागे उभी आमची यजमानीण पहात,आणी त्या दिवसा'च्या पाकिटाचा विचार करत..) छे हो..असं कसं होइल? आंम्हाला जास्तित-जास्त चांगलेच यजमान भेटतात.
त्या-(दुष्ट्पणानी..)अत्यंत सूचक बोल्ता हं तुंम्ही! छानच दिलित पण मुलाखत.अता पुन्हा कधी भेटू?,पुढच्या भागा'ची मुलाखत घ्यायला?
आंम्ही-मनात-(कशाला आता पुन्हा!?) पुन्हा ना? या ना हवं तेंव्हा या! फक्त फोनकरून या.(म्हणजे मला दुसरीकडे टळता येइल..) हे माझं कार्ड.
त्या-धन्यवाद हो पुन्हा..!
असं म्हणून,त्या त्यांच्या-"सूशी"कडे वळतात.नंतर आमच्या यजमानीण बै,आंम्हाला-कशी झाली हो मुलाखत? नै छानच झाली असेल...आमची ही मावस बहीण हो. अत्ता नविनच पडलीये या क्षेत्रात...
आंम्ही-(अंदाज आला...! इथेच पड म्हणावं आता.-हे टाळून) हो का..व्वा व्वा,फार छान! अशीच माणसं हवी या क्षेत्रात...चला येतो आता. असे म्हणून मनात राम..राम..म्हणत 'घरला' मोर्चा वळवतो.
====================================================
त्यामुळे,आमच्या एका कोल्हापुरी कविमित्राचा ह्यो सवाल जबाब,मनी कायम चिंतावाच लागतो
संस्कृती-संरक्षकांपासुनी,सावध चित्ता करी जरा
संस्कृतीप्रेमी मनुजांसंगे,मन जोडोनी पुढे चला...रं रं रं रं..माझे रामा तू रं..हे हे हे हे हे हे हे ह्हे!!!
अहो,आले आले संस्कृतीरक्षी,मन त्या पक्षी जोडू नको..
संस्कृतीप्रेमी खरी-रक्षिता,कधिही त्यांसी तोडू नको...जी..जी..रं जी..माझे रामा
अरे धर्माचा हा भुल भुलैय्या,डोंबारी तू तिथे खरा ...
सभोवती हे सज्जन जमले,खेळ पहाण्या तुझा जरा..रं रं रं रं माझे रामा
खरा धर्म तो नस्तो केंव्हा,जगी असा'ही नाही तो..
धर्मामध्ये खरे'च सारे,धर्मची ग्वाही ही देतो...जी जी रं जी माझे रामा
अरे जात म्हणोनी पुरोहिताची,एकच जाती तुझी असे..
धर्म-नाम जर देशी त्याला,जगी होतसे तुझे हसे...रंरं रं रं माझे दादा
धर्म-सुधारून कर्म करावे,मानवता ती होई खरी
अप्रीती हे बक्षीस त्याचे,कडू लागले तुला जरी...रं रं रं माझे दादा
===================================================

तर...अश्या बर्याच बर्या वाइट म्याच आमच्या भिक्षुकजीवनात अधून मधून होतच असतात.त्यातून आमचं क्षेत्र संस्कृतीशी जोडलेलं आणी आमच्या क्षेत्राला इथली संस्कृतीही जोडलेली!
त्यामुळे,आमच्या एका कोल्हापुरी कविमित्राचा ह्यो सवाल जबाब,मनी कायम चिंतावाच लागतो
संस्कृती-संरक्षकांपासुनी,सावध चित्ता करी जरा
संस्कृतीप्रेमी मनुजांसंगे,मन जोडोनी पुढे चला...रं रं रं रं..माझे रामा तू रं..हे हे हे हे हे हे हे ह्हे!!!
अहो,आले आले संस्कृतीरक्षी,मन त्या पक्षी जोडू नको..
संस्कृतीप्रेमी खरी-रक्षिता,कधिही त्यांसी तोडू नको...जी..जी..रं जी..माझे रामा
अरे धर्माचा हा भुल भुलैय्या,डोंबारी तू तिथे खरा ...
सभोवती हे सज्जन जमले,खेळ पहाण्या तुझा जरा..रं रं रं रं माझे रामा
खरा धर्म तो नस्तो केंव्हा,जगी असा'ही नाही तो..
धर्मामध्ये खरे'च सारे,धर्मची ग्वाही ही देतो...जी जी रं जी माझे रामा
अरे जात म्हणोनी पुरोहिताची,एकच जाती तुझी असे..
धर्म-नाम जर देशी त्याला,जगी होतसे तुझे हसे...रंरं रं रं माझे दादा
धर्म-सुधारून कर्म करावे,मानवता ती होई खरी
अप्रीती हे बक्षीस त्याचे,कडू लागले तुला जरी...रं रं रं माझे दादा
===================================================
गुरुजींचे भावं विश्व!.. भाग-१
खुलासा-भिक्षुकी/पुरोहितपणा/भटजीगिरी, हा या लेखनाचा गाभा आहे... पण
तरिही,यातले अनुभव मांडणारा जो कुणी भटजी आहे,तो मी (स्वतः)
नसून,आमच्यातल्या अनेक सर्वसामान्य भटजींचं ते एकत्रित व्यक्तित्व आहे असे
समजावे!
===============================================================================
लेखाचं नाव,हे हल्ली चित्रपटांचं शीर्षक जसं लांब लचक असतं,तसं ठेवावं असं वाटत होतं...म्हणजे-गुरुजिंचे भावं विश्व..याच्या ऐवजी,"आज-कालच्या विश्वात गुरुजी लोकांना मिळणारा भाव!" पण तो मोह आवरला.चित्रपटाच्या तंत्राचं अनुकरण करून भाव खावा,असं वाटलच नाही!चित्रपटांना दोन ते तीन अक्षरी "छोटस्सं" नाव द्यायचं पण फॅड असतं,पण तो(ही) मोह अवरला..."लहान मोह टाळतो,तोच मोठा मोह टाळू शकतो" अशी विद्वानांची वर्तमान पत्रातून ,लोकांच्या मते वेचक(आणी आमच्या मते-जाचक) विधानं छापून येत असतात,त्याची अठवण जाहली! माझ्या बाबतीत मोठा मोह अधी टाळला गेला,,,लहान नंतर! इष्ट परिणाम साधला गेला,पण तो विद्वानांच्या वचना प्रमाणे साधला गेला नाही..म्हणून मी असामान्य होण्यापासून मुकलो! (असामान्य ही वर्तमान जगातली एक भारी जमात आहे.असं आमचं खाजगी मत आहे!)
"अ"सामान्य/"ब"सामान्य/"क"सामान्य असण्यापेक्षा सर्वसामान्यच असणं मला बरं वाटतं.खरंतर सर्व सामान्यही नको,कारण त्यातला सा वगळला की माणूस सर्वमान्य होतो.लोकमान्य/सर्वमान्य...हेही आपल्याला परवडणारं नाही. तेंव्हा आपण आपलं सामान्यच असलेलं बरं! अता अश्या या सर्व मतामतांच्या गराड्यात माझ्या सारख्या सामान्य भिक्षुकानी ही भिक्षुकिच्या धंद्याची आत्मकथा का सांगावी? तर...एका धंद्याची आत्मकथा,ही दुसर्या धंद्याची बोधकथा ठरते,असं पर्वाच कुठेसं वाचलेलं अठवलं...म्हणून! (तसच,माझे एक काका मला नेहमी म्हणत,"अरे आत्मू...आपले अनुभव दुसर्याबरोबर नेहमी शेअर करावे...गुरु करण्यापेक्षा हे "करणं"..फार मोलाचं असतं...बरं का???...म्हणूनही!)
पौरोहित्याचा व्यवसाय झालाय हे सत्यच आहे.कुठल्याही गोष्टिची मागणी वाढली,की तिचा व्यवसाय होतोच.त्याला पौरोहित्यही अपवाद उरलेलं नाही! हा व्यवसाय अलिकडे तेजीत आलाय,म्हणजे गेल्या पन्नास एक वर्षातली मंदी संपली हे उघड आहे!प्रत्येक व्यवसायाला ही तेजी/मंदी असतेच.पण जो व्यवसाय तेजीत असेल त्याच्यावर स्तुती-सुमनं उधळणारे जास्त तेजीत असतात,असा आमचा एक नम्र अंदाज आहे.गुरुजी लोकांकडे असणार्या गाड्या...(म्हणजे-टू व्हिलर हो!!!पुण्यात अजूनही टू व्हिलरलाच गाडी म्हणतात,आणी फोर व्हिलरला-"कार"..!!!) मोबॉईलं ,स्वच्छ टापटीप कपडे(धोत्रा-सह! ) व काहि प्रमाणात यजमानांना समाधान देण्याची धडपड...त्यामुळे होणारा धनं-लाभ!आणी मिळणारी प्रतिष्ठा-(आहा...क्या केहेने!!!? ) या गोष्टी विद्वान टिकाकारांच्या नजरेत न भरल्या तरच नवल! ह्या टीकाकारांची क्षेत्र सुद्धा निरनिराळ्या आघाड्यांवर टिकून असतात... विद्वान टीकाकार असोत,किंवा टीकाकार विद्धान असोत! मला ती "ऊंची" गाठणंही जमल नाही.
नीट निरिक्षणा अंती,कुठल्याही क्षेत्रातल्या फार थोड्या विद्वानांनी "विद्या विनयेनं" ह्या त्यांच्यातल्याच उक्तिनुसार ही उंची गाठलेली दिसून येते.बाकिचे तळातल्या-रसाशीच स्वारस्य ठेऊन असतात.आणी त्यालाच ते (विद्वत्ततेचं)रहस्यही म्हणत असतात! (असोत....आंम्हास काय त्याचे?)
अश्याच एका विद्द्वानांची व आमची एक दिवस "गाठ पडली ठका-ठका" की कायशी म्हणतात ती पडलीच एक दिवस! कुठल्याही व्यवसायात "छळ" होण्याच्या काही कॉमन जागा आहेत,ही पुढे सादर होणारी त्यातलीच एक ! यातल्या आमच्या दिव्य नशिबी आलेल्या या ठका'ला आपण,संवाद रसं-ग्रहणाच्या (काय मराठी फ्रेज सुचली तिच्यायला...!) सोईखातर "ठ" म्हणूया... आणी हे'ही अक्षर धंद्यातल्या सवयीनुसार बरोबरच आलं हो! शेवटी हे विद्वान असोत वा धार्मिक...कर्म'ठ पणा हा स्थायीभाव...त्यामुळे "ठ" हे अक्षर अगदी बरोब्बर आलं! अता या व्यक्ति विशेषांचं अजून एक वैशिष्ठ्य- हे अर्ध्या हळकुंडाने पार पिवळे झालेले असतात,पण ते मान्य असण्याची धमक यांच्यात नसते... आणी ती तशिही असो/नसो..आंम्हास काय त्याचे ? पण हे आमचा छळ करतात.. हे नक्की! प्रसंग असा अस्तो,आपण एखाद्या कार्यालयात लग्नविधिंची गाडी अर्ध्यावर आणून-सोडलेली असते...यजमानपक्षातील वधूसह असलेला स्त्री-समूह..वधूची साडी बदलणे या महान कार्यास हातभार लावावयास गेलेला असतो! आपण मनात काम लांबण्याची कटकट साठवत,आणी हतात कुणितरी दिलेला त्या कार्यालया इतकाच मिळमिळीत चहा अटवत बसलेलो असतो...आणी तेवढ्यात....आपल्या कानावर मागून "नमस्कार...नमस्कार..नमस्कार..." असा प्रतिध्वनी येतो... आणी आमची व त्यांची म्याच सुरू होते.
ठ विरुद्ध अ
ठ-नमस्कार...नमस्कार..नमस्कार...
अ-नमस्कार...बोला...
ठ-आपण काय पुण्याचे का? (हे ठ लोक कध्धिही मूळ विषयावर येत नाहीत!)
अ- ..हो...! (संक्षिप्त उत्तर-सावध पवित्रा..!)
त्यानंतर बरच अवांतर करून ठ एकदाचे मुद्द्यावर येतात...
ठ-अहो..माझी एक शंका आहे...
अ- क्काय?
ठ- जानव्याला तीनच पदर का असतात?
अ-(कुणाच्या?-हा प्रश्ण मनात दाबून) अहो चार नसतात,म्हणून तीन असतात!!!
ठ-हॅ..हॅ...हॅ...युक्तिवाद करू नका..खरं उत्तर द्या...!!!(यावर आंम्हाला तात्काळ खुलासा करू न देता..पुढे..प्रश्णांचा भडीमार होतो)
ठ-नै मंजे....वेद तर चार आहेत ना?...आणी सगळे समान आहेत ना? मग हा एकच मुद्दा असा असमानतेचा कसा काय? आणी माहित्ये का...मी असं ऐकलय की जानव्याच्या तिन दोरकांपैकी प्रत्येक दोरकाच्या तंतूवर एकेक देवता सूक्ष्म(जंतू) सारखी बसलेली असते!!! हे ख्वरय का?
(ह्या टी टाइम मधल्या मिळणार्या शांततेचा झालेला भंग/त्यामुळे मनात आलेला राग आणी हतात चहा संपल्यावर घेतलेली तंबाखू एकत्रित चोळत...मग आंम्ही स्वैर फटकेबाजीचं तंत्र अवलंबतो!)
अ-अजोबा...रिक्षाला चाकं किति असतात..तीन!!! आणी आतल्या हँडलरूपी चवथ्या सूत्राशी त्यांची गाठ पक्की बसलेली असते... तसच नै का जानव्याचं सगळ...!? एकमेकावर अवलंबून आणी समसमान! है कि नै!!! आपल्याला ते कळत नाही,आणी त्यामुळे ख्वरं/ख्वरं उत्तर मिळत नाही.. है कि नै!!! (वीरेंद्र सेहेवाग की जय!!!-हा अजोबांचा निष्प्रभ चेहेरा पाहून आलेला मनातला आवाज! )
ठ-आणी ते तंतूवरच्या अधिष्ठीत असणार्या देवतांच क्काय? (हे हल्लीच्या धर्माची माहिती देणार्या पुस्तकांचे प्र-ताप...ही पुस्तकं धर्माची माहिती देतात,पण त्यांना माहितीचा धर्म कसा पाळावा..?हे अजिबातच कळत नाही!..असो!)
अ-(त्याच जोशात..! ) जंतू हेच त्या देवतेचं नाव आहे... तीचं मूळ कापसात आहे..म्हणून ते जानव्याच्या दोर्यात आहे,तीच त्याची शक्ति आहे..आणी नीट केली तर भक्तिही आहे.
ठ-(अत्यंत आनंदून) अरे व्वा...! फ्फारच छान माहिती दिलित हो गुर्जी...तुमचं कार्डं द्या ना...!
अ-(ह्हा....!चेहेर्यावर आलेला सुटकेचा आविर्भाव दडवत) हे घ्या...
ते कार्ड घेऊन टळतात... आणी मागे ही मज्जा वेंजॉय करत(तश्याच उभ्या) असलेल्या वधूच्या करवल्या(ह्या हल्ली अ नेक असतात!) आंम्हाला बोलवायला,आमच्याकडे वळतात...
===========================================
छळ छावणी क्रमांक दोन- ठिकाण ..कोणत्यातरी यजमानाचं नवं घर,प्रसंग-अर्थातच वास्तु-शांतिचा!
इथे साहित्य क्षेत्री विदुषी शोभावी अशी एक महिला आमचे समोर(म्हणजे बाजूला) अवतरते...
गुरुजीईईईईईईईईईई...........ही हाक अतीव आदरानी काठोकाठ भरलेली असते... अता गुरुजीपणाच्या नवेपणात ह्याला आपलंही मन सज्जनपणा/श्रद्धा म्हणून जातं पण नंतर काहि पावसाळे गेल्यानंतर यातलं हीण कोणतं आणी कसं कोणता हेही ओळखायची सवय होते..!
त्या-मला ना...आमच्या मासिकासाठी तुमची मुलाखत हवी आहे? इथेच द्याल का? हा कर्यक्रम संपल्यावर... सुशी ओरडणार नै कै मला...(ही त्यांची- सुशी..म्हण्जे आमच्या यजमानांच्या सुविद्य पत्नी असतात..असं नंतरहून आंम्हाला..त्यांचा(ही) सह भाग मुलाखतीत झाल्यानंतर कळतं..)
......................

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)