लेखनानंद
शनिवार, ४ एप्रिल, २०१५
माझा देश: डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम
माझा देश: डॉ आंबेडकरांच्या चष्म्यातून इस्लाम: मुस्लिमांचे शत्रू किंवा द्वेष्टे म्हणुन नाही - तर त्यांचे हितचिंतक म्हणुन डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी इस्लाम धर्माची चिकित्सा केली आहे...
रविवार, २९ मार्च, २०१५
यजमानांचे पान: वेदाध्ययनातील- संथा देणे... अर्थात वेदाभ्यास शिक्ष...
यजमानांचे पान: वेदाध्ययनातील- संथा देणे... अर्थात वेदाभ्यास शिक्ष...: खुलासा:- वेदपाठशाळांमधे प्राचीन काळापासून अध्ययन/अध्यापनाची एकच एक अशी, परंपरागत पद्धती रहात आलेली आहे. ही पद्धती फक्त पाठ करून ठेवण्याच्या...
मंगळवार, २४ मार्च, २०१५
गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३६ (विवाह विशेष...-३..अंतिम.)
" बरं बरं...असू दे हो...असू दे. आता उद्या पुतण्याला आशिर्वाद देताना..असच तुझ्यासारखं जागं-कर..,म्हणजे झालं...क्काय????"
पुढे चालू...
=================================
हा सर्व संवाद माझ्या मनात अमृतासारखा झिरपत होता..आणि मी त्याच चिंतनमय अवस्थेत कधी शांत झोपि गेलो,ते कळलंही नाही.
..............................................
कोकणात पहाटे एखादं लग्नघरच काय?..परंतू सर्व गाव, आजंही तसं लवकरच उठत असतं. त्यामुळे शहरी वहानांची घरघर इथे नसली तरी,घरातल्या माणसांची नोकराचाकरांची ती वर्दळ..,सकाळी सकाळी खराट्यानी जमिन-झाडली जाण्याचा तो आवाज, गोठ्यात (असल्या तर..) त्या गाईं वासरांचे ते-हंम्म्मु..हम्वॉssssआणि रेड्या/म्हैशींचं-अंव्यां..डुर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र!, निरनिराळे पक्ष्यांचे आवाज..हे सगळं सहज कानी पडत असतं..त्यामुळे येथे तशी वेगळी जाग आणण्याचे प्रयोजन फार पडतच नाही. आणि इथे तर काय ,हे तर आख्खं लगीनघरंच होतं.त्यामुळे पहाटे चारा'पासूनच लगबग. मला त्या दिवशी पहिली जागंही पहाटे चारा'लाच आली,तेंव्हा बाजुच्या एका रिकाम्या केलेल्या गोठ्यात बल्लवाचार्य मंडळी त्यांच्या पूर्वरंगात आलेली होती.... गुलोपचा मंदप्रकाश आणि लाकडी फल्यांवर वांगी आणि बटाटे कापण्याचा खट खट खट खट असा एक एकं-सुरी आवाज आत मधून-बाहेर येत होता.मी त्या आवाजानी जागा झालो खरा,पण पुन्हा त्याच एकं-सुरी तालात, काहि सेकंदात जो झोपलो,तो आमच्या महान मित्रानी किश्यानी जागं करेपर्यंत! . यावेळी मात्र किश्यानी मला सुखद धक्का दिला. मला अगदी साग्रसंगीत उठविण्यात आले. नवरदेव आत्मराज...उठा उठा ..हे शब्द कानी आले.आणि मी, हा किश्याचाच काहितरी चावट्पणा असणार ,अश्या विचारानी डोळे किलकिले केले,तर माझ्या समोर ती साक्षात वेदोनारायणांची जोडगोळीच हे शब्द बोलत उभी. श्रीराम आणि जयराम.आणि त्याच भल्या पहाटे अंगण्याच्या एका बाजुला आमच्या काहि मित्र मंडळींसह पलिकडे आसन टाकुन संध्यावंदन करत बसलेला, हेमंतादादा आणि माझा पाठशाळेतला जिगरी यार-सुर्या...,असे दोघेही दिसले. मग मात्र मी ,ती कमी मिळालेली झोप वगैरे विसरून खरच प्रफुल्लित होऊन उठलो. ही चारंही लोकं येऊ शकणार नाहि..असं मला कळल्यानी मी थोडा नाराज होतोच. पण व्यवसायव्यवस्थासम्राट किशोरबुवा सहाय्यक'पुरोहित पुरवकर,..यांनी रात्रितल्या रात्रित फोन फिरवून..यांना आणतं केलेलं होतं.(आणि तसाही मी ते आले नसते,तर नाराज होणार असलो,तरी रागावणार मात्र नव्हतो. अहो, सगळ्या भटजींनी जर स्वतःच्या व्यवसायातल्या/नात्यातल्या/मित्रत्वातल्या, सगळ्या लग्नांना हजेरी लावायची ठरवली,तर लग्न-लावायला एक तरी पुरोहित-उपलब्धं राहिल का???... असो!
)
मग सगळ्या दोस्त मंडळींनी माझा ताबा घेतला.मग श्रीराम आणि जयरामनी, अंघोळीच्या वेळी मला खास त्यांच्या कडनं आणलेलं,कसलसं उटणं आणि एक दोन अत्तरं,असं सगळंच्या सगळं अंगाला लावायला घेतलं. बरं लावलं तर लावलं,पण त्याचं सूख सरळ तरी अंगी-लागणार होतं का? तर नाही! किश्या हरामी, मला छळण्याचा एकंही चान्सं सोडत नव्हता.जसं जयरामनी अत्तर आंगाला चोपडलं,तसा किश्यानी मागुन माझ्या कानांजवळ "चल..सूट रे आत्मुंदा..झाली.., ही वेळ आली...बकरा काटावयाला,साक्षात दुर्गा आली..." अशी बासरी-वाजवायला सुरवात केली. आणि पुढे म्हणजे चावट्पणाचा कहर केला. एरवी मी कित्तीही सामान्य मनुष्य असलो,तरी मला तो बांगड्यांचा आवाज, पैंजणांची रुमझुम, आणि लाडिक हलका स्त्रीस्वर, हे काहि सेकंदांपेक्षा जास्तवेळ आणि ते ही कानांजवळून ऐकू येत राहिले,तर सर्वांगाला आतून नको इतक्या असह्य गुदगुल्या होतात. आणि हे सर्व नी...ट ठाऊक असलेला हा किश्या, मुद्दाम लाडिकपणे बाईचा आवाज काढून ते गीत विडंबीत-गात होता,आणि एका हातात चार बांगड्या आणि कुणाचं तरी पैंजण आणून..त्यानी त्यावर ठेका धरत होता. मला मेली कधी ती एकदाची अं घोळ संपते असं झालं होतं. आणि तेव्हढ्यात तिथे विहिरीजवळ काकू आली,आणि किश्याच्या पाठीत एक कचकन धपाटा घालून... "किश्या..हलकटा, हो वरती तिकडे घराकडे...चावट माणूस कुठचा!" ..असं म्हणून त्याला हकलंलन. श्रीराम आणि जयरामनी , 'मला सगळी राजेशाही सेवा-घ्यायला(च) लावायची' ,अश्या किश्यानीच सोडलेल्या आज्ञे बरहुकुम माझं त्याच अंघोळीच्या दगडावर अंग पुसायला घेतलं. मग काकूनी आणलेलं मस्तं जाड वेलबुट्टीदार काठाचं स्पेशल मद्रासी धोतर आणि वरती त्याच टैपचं उपरणं असं तिथेच नेसून.. मी श्रीरामनी आणलेल्या (कर्नाटकी..)लालचॉकलेटी डार्क कुंकवाचा टिळा-करुन...घराकडे रवाना झालो.
तिकडे सदाशिवदादा आणि हेमंतादादा, विधींची अगदी फुल्ल तयारी लावूनच बसलेले होते. अंगणाच्या मांडवात इतरंही काहि नातेवाइक मित्रमंडळी थांबलेली होती. एका कोपर्यात दोन खुर्च्यांवर गुरुजी आणि सखाराम काकाचं गप्पा..चहा असं सगळं चालू होतं. आणि मग काहि वेळातच काकाच्या नियोजीत कार्यक्रम पत्रिकेतले...ते विधी सुरु झाले. मांडवात आइ वडिलांसह वैजू आणि तिच्या चारपाच मैत्रिंणींचं आगमन झालं. आणि मग तो कन्यादानाचा पर्यायी विधी सुरु झाला. एरवी कन्यादानाच्या विधीमधे वधुवरं आणि वधुचे आइवडिल अशी चारच लोकं असतात. पण इथे माझेही आईबाबा जोडले गेले होते. मग मला हिचा हात, पाणिग्रहणाच्या श्टाइलनी धरायला लावून.. ,आधी सदाशिवदादा हेमंतादादाचे (पर्यायी..)मंत्र झाले.,मग काकानी कडेनी, "हे वधुवरा... आजपासून तुम्ही परस्परांना एका शरीरासारखं स्विकारत आहात..तुमच्यामधील आत्मभाव जाऊन त्याजागी एकात्मभावाची प्रतिष्ठापना होऊ दे अशी आंम्ही सर्वजणं त्या विवाहप्रधान दैवताकडे ,लक्ष्मी नारायणाकडे प्रार्थना करतो..." असं तिनवेळा म्हणवून तो नवंविधी पार पाडला. पुढे मग सूत्रवेष्टण(कंकणबंधन)-मणिमंगळसूत्र-विवाहहोम इत्यादी विधी थोडे फार बदल वजा जाता ,आमच्या पारंपारिक पद्धतीनेच पार पडू देण्यात आले. आणि मग सप्तपदीला मात्र पुन्हा काकानी त्याच्या स्वतःच्या मतीने रचलेली सप्तपाऊली गायली...आंम्हा दोघांनाही त्या तांदुळाच्या पुंजिकांवर एकत्र चालवले गेले.
प्रथमपदी होते सुरु सह-जीवना ते
द्वितीयपदी येता जाणिवा जागृती दे
तृतीयपदी येता संपू दे आत्मंभावं
चतु:पदी होता जन्मू दे प्रीतीभावं
पंचःपदी या रे गृहस्थाश्रमी या
षट्पदी मिळू दे पूर्णता होऊनी त्या
सप्तपदी आली ती घडी मीलनाची
एकस्वं होऊ दे ही,भेट दोन्ही जिवांची
आजुबाजुनी उपस्थित सर्व मंडळीकडून... काहिंचे कुतुहलानी, काहिंचे तिरपे कटाक्ष टाकत..,काहिंचे शंकेखोर मुद्रांनी, तर काहिंचे स्वागतोत्सुक चेहेर्यांनी आमच्या ह्या विवाह नवंविधींचं, अगदी पूर्ण चित्री-करण चाललेलं होतं. एकतर हे सर्व विधी,त्यातल्या बहुसंख्य ठिकाणी होता होताच लोकांना कळत होते. त्यातंही विधींचे अर्थ ऐकत बसा..ही लोकांसाठी काळानुरूप निर्मिलेली प्रोफेशनल-सोय, खुद्द पुरोहितांच्या विवाहांमधे नसतेच. असण्याचे कारणंही नसते. पण तरिही आज या अदलाबदलीच्या धर्मविधींची कारणं, तिथल्यातिथे स्पष्ट होणं गरजेचं रहाणार आहे..हे काका नीट जाणून होता. तसेही तो स्वतः लावत असलेल्या लग्नविधींचा प्रकार हा असल्याच टाइपचा होता..पण तो सर्वच्या सर्व, पारंपारिकांना सहन होणारा नव्हे याचीही त्याला पूर्ण कल्पना होती. म्हणूनच ते एक्सट्रा अपडेटेड व्हर्जन टाळून , आज केलेलं हे सॉफ्ट व्हर्जनंही काकानी लोकांच्या बरच गळी उतरवलं. त्यात गुरुजिंशी जाहलेल्या,त्या रात्रीसंवादाचाही महत्वाचा वाटा होताच. मग तासादिडतासात हे विधी अवरल्यावर सगळी लोकं आमंत्रणात कळविलेल्या वेळेला जमली,की मग सरळ मंगलाष्टकं होवून हा कार्य क्रम पूर्णत्वाला न्यायचा.., असं पुढील नियोजन असल्यामुळे,सर्व जणं काहि तासांकरिता विश्रामावस्थेत गेले.
मला मात्र का कोण जाणे ? , आता हा मधला दोन तासांचा कालावधी असह्य वाटू लागला. एकतर किश्यानी आमच्यावर अशी टाइट फिल्डिंग लाऊन ठेवलेली होती...की आदल्या दिवसापासून आंम्ही एकमेकांशी नीट बोलणे तर सोडाच एकमेकाकडे पाहूहि शकलेलो नव्हतो.. या किश्याखेळीचं कारण पारंपारिक श्रद्धेशी असण्याचा संबंध नव्हताच...पण हा चावट्ट माणूस तिच्या आणि आमच्या मित्रमैत्रिणमंडळा बरोबर त्यांना पटवून..असे ठरवून बसलेला होता...की आपण लग्नातली जी मंगलाष्टके म्हणणार आहोत...त्याच्या भावंजागृतीचं काम..या जाणिवपूर्वक केलेल्या ताटा-तुटीनी (?) साधलं जाणार आहे. ( दुष्ट....
) आता यामागची पूर्णछळयोजना न कळण्याइतके बालवयीन कोणीच आमच्या
त्यांच्या मंत्रीमंडळात...,आपलं ते हे...मित्रमंडळात नव्हते! पण त्यातली
मजा या सगळ्यांनी घ्यायचीच ठरवलेली होती,त्यामुळे मला एकंही फितुर-मिळे ना!
(
) एकदोन वेळा मी तो चक्र व्यूह तोडायचा प्रयत्न केला..पण कुठे
घराबाजुच्या तिची खोली असलेल्या,वळचणीच्या खिडकिकडून हाक मारायला जावं , तर
आधी आवाज तिचा यायचा आणि जवळ गेल्यावर हॉरर शिनेमात जसा भस्सकन अचानक
भुताचा चेहेरा समोर येतो...तशी तिच्या जागी तिची कुणितरी मैत्रिणच खिडकितून
हडळीसारखं तोंड काढायची. त्यांच्या घरात शिरायची तर मला जणू काही बंदिच
केलेली होती. (
) मग माझे गड फोडायचे एकदोन प्रयत्न निष्फलीत झाल्यावर मी सरळ काकाच्या
शेजारी मांडवातच जाऊन बसलो..म्हटलं, ह्याचा मूड पाहून आपण ह्याच्याकडूनच
काहितरी तोड काढू...पण तेव्हढ्यात चमत्कार जाहला. आणि किश्याच्या बायकोनी
मला, हताला धरून..., "चला हो भावजी आत जरा..., तिच्या आज्जीला तुम्हाला
पुणेरी पगडी घालायची आहे.." असं सांगून किश्याच्या देखत मला घरात नेलं. मी
आत मागच्या पडवीत गेलो..तर आज्जीहि नाही आणि पगडीही नाही...आणि नुसत्या
मोकळ्या पडवीत..त्या एकदोन भाज्या चिरणार्या कामकरणी वजा जाता... मी
एकटाच!,अशी अवस्था पाहुन मि ही चक्रावलोच. म्हटलं...,हिच्या त्या महान
मैत्रिणी..मला कोंडूनबिंडून ठेवतायत की काय इथे ?... मंगलाष्टकांना
जाइपर्यंत!
पण तेव्हढ्यात मला पडवीकडेच्या कोपर्याकडून आवाज आला... "आत्मू......!" . मी तिकडे पहातो,तर तिथे नुसतेच तिन चार भलेमोठ्ठे कोकम शिरपा'चे प्ल्याश्टिकचे ड्रम ठेवलेले होते. मला नक्की कळेच ना,आवाज कुणाचा? आणि कुठनं येतोय! मग मी,सुकडींच्या ढिगाखाली दडलेलं फुरसं शोधायला (हतात काठी घेऊन..) पुढे सरकावं(ब्याट्री घेऊन!..),तसा मी त्या ड्रमांच्या दिशेला (भीत..भीत) गेलो...मागच्या त्या दोन्ही कामकरणी तोंडाला पदर लाऊन जाम हसत होत्या. आणि मी जसा जवळ गेलो,तशी त्यातल्या एका कामकरणिनी "आला गो... जवल तुज्या आला.." म्हणून हाळी-टकलीन,तशी त्या ड्रमामागून वैजूच बाहेर आली. मी तिचा तो माफक नटलेला अवतार पहायचं सोडून,आधी एक सेकंद दचकलोच! म्हटलं, "अगं काय गं हे? मला काय, 'भ्भो..' करायला लपवलीवतीस की काय?" तर माझ्याशी बोलायचं सोडून (माझा दचकलेला चेहेरा आठवित..) आधी हसतच राहिली मिनिटभर. (
) आणि मग मी, "तू एकटीच आहेस? की अजुन तुझ्या मैत्रिणीही दडून बसल्येत
त्या ड्रमांमधे!? " असं विचारल्यावर तर ती आणि त्या दोन कामकरणी आणखिनच
हसत सुटल्या. आणि मग हसता हसता...हतानीच, 'नाही..नाही' अशी अॅक्शन करत ही
बया माझ्याशी बोलायला लागली.
ती:- "काहि नाही रे, मी कालच ठरवल होतं..तुझ्या त्या किश्याला हरवायचं! म्हणून..मग त्याच्याच बायकोला ती आज्जीची ट्याक्ट सांगून मी त्याच्या देखत तुला आत आणवलं!"
मी:- "बाप रे...! अगं ..,पण असल्या साध्या प्रसंगाला,इतकी युद्धनीती कशाला?"
ती:-"मग???? आपल्याला साधं भेटू पण का नै देत म्हणून???"
मी:- "अगं....लग्नांमधे मित्रमैत्रिणी असे छळातात..मजा करतातच..त्यात काय एव्हढं?"
ती:- "हो....तुझी प्रोफेशनल...वाक्य नको टाकुस माझ्यावर!"
मी:-"अगं प्रोफेशनल कसलं? साधं सरळ आहे हे..आणि जरा द्यावं की छळू त्यांना..आपलीच मित्रमंडळी ना ती!?"
ती:-"हो का? आणि मग तू का मगाशी खिडकिकडून आलावतास...सांग?"
मी:-".............................."
ती:-"आय्या गं रामा....तू लाजतोस???"
मी:-"ए.....लाजलो वगैरे नाही हं...उत्तर नै सुचलं मला. "
ती:-"बरं..बरं..! कळलं मला काय ते.पण आता आपण परत जाऊ...नायतं सगळे शोधत येतील इकडे..."
असं म्हणून ही पडवीतून आतल्या माजघराच्या दिशेनी गेली सुद्धा.. मागे त्या कामकरणी आमचा हा शीतंप्रेमसंवाद ऐकून अजुनंही हसत होत्या. मी मात्र त्यांच्या नजरेला नजरंही न देता...आगा काहि घडलेची नाही..अश्या आविर्भावात परत बाहेर आंगणात आलो. जाताना किश्याच्या बायकोनी रीतसर मला पगडी चढवून पुरावानशीन करूनच बाहेर सोडलं. पण त्या पगडीमुळे,त्या आंगणमांडवात माझा भाव एकदम वाढला...आणि उपस्थित असलेल्या बर्याच लोकांच्या देखत मी एखाद्या श्यालिब्रिटी सारखा
चालत चालत आमच्या शेजारील.."उतारु" घरात जाऊन विसावलो. पण विसावतोय कसला?
मला ते "आय्या गं रामा!"....सारखं सारखं आठवत होतं...आणि....असो!
...मग तिथे मला आई आणि काकूनी एकंदर ताब्यात-घेऊन, हेमंतादादानी आणलेला एक भारीपैकी नेहेरुशर्ट घालयला दिला. आणि ती पगडी आणि मुंडावळ्या...यांसह,एकंदर 'तयार' करायला घेतलं. पण जश्या त्या मुंडावळ्या बसल्या, तसा मात्र मी कॅज्युअल मोड सुटून खरोखरीच विवाह मोड मधे आलो. चित्रविचित्र उत्सुकता मनात दाटू लागली.आता इथुन पुढच्या काहि वेळानंतर ,आपण खरच 'आपले' असणार नाही,ही भावना मनात घर करू लागली. आणि याच अवस्थेत तिकडे बसलो असताना... किश्या,सुर्या,जयराम,श्रीराम,हेमंतादादा इत्यादी माझी सर्व मित्र मंडळी खोलित शिरली. मग सगळ्यांनी मिळून मला ठिकठाक करायला घेतले. किश्यानी मुंबैहुन आणलेला कसल्यातरी भारी वासाचा स्प्रे माझ्या कपड्यांवर फवारला. जयरामनी आणि श्रीरामनी मला, एका खुर्चीत..."दादा..बसं हिते!" असं सांगून बसवलं. आणि आमच्या तिकडल्या त्या पारावरच्या न्हाव्यासारखा...एक चार इंची आणि तेव्हढीच उंची असलेला,असा आरसा हातात देववून..माझ्या चेहेर्याला कसल्याश्या ग्गार कागदानी पुसून..त्यावर एक कसलासा लेप लाऊन ,वर चंदनाची पावडर लावली. नंतर परत तो लालचॉकलेटी डार्क-कुंकवाचा कोरून लावलेला टिळा-झाला. आणि मग एकदा सर्व काहि ठिकठाक-झाले आहे अशी खात्री पटल्यावर ,हेमंतादादानी..."आत्मू...आई बाबांना नमस्कार कर.." अशी अज्ञा केली. आणि मग मी रितसर नमस्कार करून,मित्रमंडळासह मांडवाकडे चालता झालो.
पाटावर हुबे ठाकल्यानंतर एका बाजुला काका आणि दुसर्या बाजुला चक्क गुरुजी अंतरपाट धरून उभे राहिले. मला अत्यंत विचित्र वाटायला लागलं. मी काकाला तसाच डोळ्यांनी खुणवू लागलो.."की...अरे गुरुजींना काय उभं केलसं तू???" ...म्हणून!. तर मला त्यानी उघडपणे "आज ते तुझे गुरुजी नाहीत,माझा मित्र आहे तो!" असं बजावून त्यानी मला गप्प-केलन. मला अत्यंत राग येऊन डोळ्यात अश्रू आले. पण गुरुजींनीच मला , "आत्मू...आजच्या दिवस काकाचं ऐकायचं...हं.वेडा आहेस काय, अश्या वेळी चिडायला आणि रडायला?" असं म्हणून शांत केलं. तेव्हढ्यात समोरच्या बाजुनी ही आणि हिच्या कंरंवंलेल्या-मैत्रिणी आल्या. मग हिला पाटावर स्थानाधीत करणे झाले. आणि काकानी आमच्या उभयता हाती लग्नमाळा देऊन,त्याच्या निसर्गदत्त खणखणीत स्वरात "सुमुहुर्त...सावधान..."अशी सुरवात केली
"सुमुहुर्त...सावधान..."
भारतभू ही सांस्कृतीकं जजनी,मांगल्य ती लेवुनी
आली आज प्रेमभरेत हृदये,आशिर्वचा घेऊनी
होवो संस्कृती-जात एक मिळण्या,तुम्हा उभयता खरी
त्याचे तोरणं भूषवो ही भरता,कुर्यात सदा मंङंगलम्....सुमुहुर्त सावधान...
पुढे गुरुजी...
म्हणता.. धर्मंही प्रतिगामी त्यास-धरिता,अपुला-असे..,हे स्मरा
निती एकं प्रधान हेतू करता,होइलं तो..ही-बरा!
आपुल्या या घरट्यातलेच जिवं हे,नांदो सदाही सुखे
त्यांचे सौख्यंही त्याच तेथं-रमणे...म्हणवा तयाही मुखे... सुमुहुर्त सावधान...
पहिल्या दोन मंगलाष्टकातच,मांडवातल्या मंडळींची वदने,-हा आता सवाल जबाब रंगतो की काय? मंगलाष्टकांच्या ऐवजी??? म्हणुन काहिशी सुन्नावस्थेकडे जाऊ लागली. अर्थातच हे सर्व ..तिथे असलेल्या सदाशिवदादाच्या कडव्या नजरेतून सुटणं शक्यच नव्हतं. मग त्यानीच तात्काळ ब्याट हातात घेऊन... पुढे..."गंगा सिंधु सरस्वती चं यमुना...." अशी एकदम पारंपारिक सुरवात केल्यावर मंडळी एकदम सुखावली. मग हिच्याकडच्या एकदोन बायकांनी आपापले गळे-मोकळे करून घेतले. त्यातंही तिच्या मावशीनी एक मंङगलाष्टक तर अत्तीशय सुंदर म्हटलं. पण ते शब्दशः इतकं भावपूर्ण होतं,की त्यामुळे वैजूच काय...?,तिच्या मैतरणीहि...एकंदरीत आसवांनी भिजल्या. आणि त्यातलं शेवटचं... "स्वानंदे तुजला निरोप देता डोळेही पाणावले" ..हे ऐकुन तर मि ही गहिवरलो! अहो..मुलिच्या बापाच्या सगळ्या भावंभावनांचा परिपाकं होता हो त्यात. आणि नेमकी त्याच भावनेनी माझ्या मनात परत..., 'एक मुलगी स्वतःचं केवळ कुटुंबच नव्हे..तर कुळं-संस्कृती सोडून,आपल्या घरी येणे...हे सामाजिक अन्यायाचे द्योतक आहे की काय???'... असल्या सा'मासिक प्रश्नांची मालिका, ऑन-होऊ लागली. पण कडेनी माझ्या चेहेर्यावरून, 'हे सर्व' चाललेलं..माझ्या मनकवड्या मित्रानी..सुर्यानी न ओळखलं असतं,तरच नवल होतं. मग पटकन त्यानी ब्याट हतात घेतली आणि..."मधुर मधुर वाद्ये,वाजती मोदंदायी..." हे सुंदर आशयपूर्ण मंङगलाष्टक म्हणून..,एकंदर माहौलच बदलवून टाकला. मग माझ्या लाडक्या काकुने त्यावर,
"प्रीती वाचुनी ना प्रपंच फुलतो,हे सत्य ध्यानी धरा
आदर्शाप्रत पोहचवा घरंकुला,नीती सदा आदरा
सांभाळा कुलंकिर्ती धन जे,माता पित्यांनी दिले
त्यांचे श्रेय्य सुखप्रद तुम्हा,कुर्याद्वयोर्मंड्गलम्"
हे त्याहुन सुंदर,आणि सहजीवनाचा खरा उपदेश करणारं मंङगलाष्टक, तिच्या निसर्गदत्त आर्तस्वरलयीनी गायलं, आणि मला खरा आशिर्वाद दिला. आणि मग मात्र किश्या...अचानक कुठेसा गायब झालेला होता तो...कसलसं लहानसं चिटोरं घेऊन..शेवटच्या पाच ओव्हर खेळायच्या अभिनि'वेषातच आत-शिरला...आणि एकदम ऊंच आवाजात-" आत्मू हा बायकोहुनीच बुटका,असला तरी ..ते असो! वैजूही.. तरी त्यास नीट धरुनी,फोटो..त सावरून बसो...आंम्ही ही..कालंपासुनी जरी,केलीच ताटा-तुटं..,तरि-ही पगडि.. घालण्यास जाउनी,झाली आत्मूची भेटं" असं एक अत्यंत शब्द बं-बाळ परंतू खट्याळ रसात न्हाऊन काढणारं...मं-गलाष्टक-टाकुन,आपण-आल्याची जोरंदार सलामी दिली. त्यामुळे अख्खा मांडव काहि क्षण खदखदून गेला. मग मात्र पुढे त्यानी,
सकलं वरदं झाल्या,देवता या मुहुर्ती
उधळि उभय शिर्षी,अक्षता होसं पूर्ती
गजरं करिती वाद्ये,दूरं झाला दुरावा
शुभदं विधि विधिंन्ने,भेटती जीवं जीवा
हे पारंपारिक अस्सल विवाहपूर्ती मंङगलाष्टक...अश्या परिणाम कारकतेनी-टाकलं,की ती मंङगलाष्टकांची आख्खि म्याच..त्याच्याच खिश्यात गेली. आणि मग अगदी अर्धातास यथासांग चालंलेली मंङगलाष्टकं..एकदम काका आणि गुरुजींनी "यावद्वीचीस्तरंगान्वहति सुरनदी जान्हवी पुण्यतोया।
यावच्चाकाशमार्गे तपति हिमकरो भास्करो लोकपालः॥
यावद्वज्रेंद-नीलस्फटिक-मणिशिला वर्तते मेरूशृंगे।
तावत्वं पुत्रपौत्रै: स्वजन परिवृतो जीव शंभो:प्रसादात्॥....सा...वधा..न!"...हे समाप्तीपद जोरात-सोडून..ती मंङगलाष्टकं-एक्सप्रेस मुक्कामी फलाटावर घ्यायला सुरवात केली..मी मात्र किश्याचा खेळ सुरु झाल्यापासून, कंटाळायला लागलो होतो..आणि कडेनी काका मला..."हं...आत्म्या, लोकांना करतोस की नै नेहमी याच अंत:पटामागे-उभं...,मग आज तू...!" असं म्हणून हसून हसून माझी कळ काढत होता. आणि जसं शेवटच्या ओव्हरचा "तदेवं लग्नं सुदिनं तदेव.." चा चेंडू पडल्याचं जाणवलं...तसा मी (हतात लग्नमाळ धरुन धरुन दुखावलेल्या खांद्यांसह...) सुटकेचा नि:श्वास सोडला. आजुबाजुनी टाळ्यांचा कडकडाट झाला..आमच्या परस्पर माळा घालणे..इत्यादी सर्व काहि अवरले.
आणि मग पुढे काहि वेळातच ..म्हणजे मुख्यतः आंम्ही दोघे निवांत झाल्यावर , दोन्ही आंगणांना जोडून तयार केलेल्या त्या भोजन मांडवात...आलेले आणि थकंलेलेंही सारे भो जनं ,जेवण्यास जाऊ लागले. तसाही पुढे तो वधुवरांना भेटण्याचा कोणताही कार्यक्रम काकानी वगळलेला होताच.आणि मलाही तो नकोच होता. 'आलेल्या लोकांना आपल्यापर्यंत मुद्दाम येऊन आशिर्वाद द्यायला कसले लावायचे???...आपण मांडवात ते बसले असतील ,तिथे जाणं आणि हवा त्यांना नमस्कार करून आशिर्वाद घेणं...हेच सर्वस्वी अधिक उचित!' - ही काकाची आणि माझिही मनोधारणा असल्यामुळे,तो तास दिडतासाचा सगळा सोहळा ,आमच्या आज्जिच्या भाषेत सांगायचं म्हणजे,आंम्ही एकदम "कटाऊट" करून टाकलेला होता. त्यामुळे त्या स्पेशल खुर्च्या मांडणं आणि त्यावर फोटुवाल्यांना आवश्यक त्या पोझ-टाकत बसणं, हे सगळच रद्दबातल झालेलं होतं. तसाही हे मंङगलकार्य स्मरणात रहाण्यापुरते..फोटो मारायला..काकानी त्याच्या संघटनेतला एक फोटोग्राफर पकडून आणलेला होताच. तो त्याला सांगितलेले फोटो एका बाजुनी हवे तसे मारत होता. आणि त्यातच सप्तपदी नंतरचे, झाल/सुनमुख/नामलक्ष्मीपूजन हे आचाराचे-तयार झालेले विधीहि (काकाआज्ञेनुसार..)करायचे नव्हतेच. शाहीपंगत वगैरे डामडौलंही नव्हता. त्यामुळे सगळ्यांची जेवणे आवरून ,लोकं जायच्या बेताला आल्यावर, त्यांचे निरोप होता होता..आमची दोन्ही घरच्यांकडची एकच शेवटची पंगत्,त्याच आंगण्यात लागली. फक्त किश्याशास्त्री व्यवस्थापककर..,यांनी आमची मित्रमंडळींची एकपंगती...चांगली लांबलचक म्यानेज करून, त्याच्या बरोब्बर मध्यभागी आमची दोघांची आसनव्यवस्था-केली होती. हेतू स्पष्ट्च होता..आंम्हाला मनसोक्त चिडवता यावं!
मग जेवणं सुरु झाली..आणि मला अज्जिब्बात इंट्रेस नसलेला.."उखाणे" , नावाचा महाभयंकर प्रकार सुरु झाला. आणि इथे किश्याच्या जोडीला सुर्याही आला. दोघांनी मेल्यांनी...स्वतःची जेवणे सोडून्,उखाण्यांचाच घास-घ्यायचा चंग बांधला होता. मग सर्वात आधी मला , उखाणा-घ्यायला लावण्यात आला. मी आपला भाजीत भाजी...आजी माजी...ह्याची त्याची...अशी शोधाशोध करायला लागलो,तर काकानी मागच्या लैनीतून माझ्यावर.."आत्मू....अरे ते दुसर्यांची लग्ने लावताना,त्यांना सुचवितोस...तसले काहितरी आयत्यावेळचे ..घे...कि आता!" असा बाँम्ब टाकुन, माझी पुरती कोंडी करून टाकली. मग मी आपला "रायगडचा आंबा,गोव्याचा काजू..आणि वैजूचं नावं घ्यायला,मी-कशाला लाजू?" असं म्हणून ...एकदाची-मान टाकली. हिनी मात्र, "कंठात शोभतो रत्नहार्,हातामधे कंकण..." ..अशी पहिली ओळ खरोखरी आलंकारिक घेऊन्,पुढे..."आत्मारामी घर माझे,आत्मारामी आंगणं" अशी माझी नको इतकी तारीफ करवणारी माळ त्यात टाकली. पण उपस्थितांचा त्यालाही कौतुकपूर्ण प्रतिसाद मिळाला. पण किश्या आणि सुर्याला मात्र, हे सगळं ग्गो...गोड चाल्लेलं बघवत नव्हतं. (दुष्ट मेले..
) . मग आधी किश्यानी "वैजू दे गं आत्म्याला तू,गुलाबजामूनचा
घास,आत्म्या...खरच देत्ये..ती...तो...,आता तरी हास!" . असा फास माझ्या
गळ्याभोवती टाकलाच. मग सुर्याला सुरसुरी आली.. आणि त्यानी "आत्मूवरती
मित्रमंडळी खातात भलताच खार, कारण..पहिल्याच फटक्यात आत्मूचा..सरळ उडाला
बार" असं म्हणून मला गुर्जिंदेखत ठ्ठार केलन मेल्यानी. पंगतीतली माझ्या
गुरुजी आणि काकूसह जेवणारी लोकंच काय?,पण त्या वाढणार्या बाया मुलि
देखिल...हसून हसून लोळायच्या शिल्लक राहिल्या होत्या. मला सारखा प्रश्न
पडे,की गुरुजी इथे असताना...हे दोघे, असे चावटपणा कसे करु शकतात?. पण नंतर
काकानी(च) यांना 'अभय' दिलय आज..हे कळल्यावर मला काकाचाच जास्ती राग आला.
यावर कडी की काय..म्हणून काकानी चक्क काकूलाच उखाणा घ्यायला लावून..."आंम्हाला ऐकू दे की आमच्या मित्राचं नाव उखाण्यातून...तेंव्हा आंम्ही कुठे होतो?- ते ऐकायला..." असा तिला बरोब्बर-अडकवणारा आग्रह केला. आणि सगळी पंगत..'काकूच आता चिडतेबिडते की काय?' अश्या मुद्रेनी काकूकडे पाहू लागली. पण काकूनी आंम्हा अत्रंगी,चिडखोर,भोळ्या,लबाड,भांडखोर.., अश्या सर्व प्रकारच्या मुलांना, पाठशाळेत इतकी वर्ष काहि असच सांभाळलेलं नव्हतं!...तिथे काकाला सांभा़ळून घ्यायला ,ती काय हरणार होती होय? मग काकुनी सगळ्यांना , "हे पहा..,माझं जेवणंही आटोपलय..म्हणुनंही..आणि आता या वयात एव्हढ्ढास्स्सा उखाणा वगैरे घेऊन्,मी तुंम्हा तरुण पोरापोरींचा आणि सखाराम भावजींचा मान कशाला कमी करु? ..मी आपली एक जुन्या ठेवणीचं गाणच गाते,त्यालाच हवा तर उखाणा समजा!." असं म्हणाली. आणि काकुचं गाणं..म्हटल्यावर..मग नाकारेल कोण? आधी काकूनी गायलेलं मंङगलाष्टक सगळ्यांच्या स्मरणात होतच. मला तर मनातून या निर्णयाचा आनंदच झाला. कारण काकूचं गाणं..म्हटल्यावर...,याच्या इतकी चिरस्मरणीय आनंदाची ही लग्नभेट , माझ्यासाठी दुसरी कोणती असणार होती? आणि काकूनी गाणं तरी कोणतं निवडावं...? ज्याच्यामधे तिच्या त्यागंपूर्ण ,आणि तरिही प्रीतीमय केलेल्या संसारी जीवनाचं प्रतिबिंब उमटलेलं होतं..,-असच!. काकूनी आलाप घेऊन सुरवात केली...
"आं...sss...
मुरलीधर..घनःश्याम सुलोचनं..मी मीरा तू...माssझे जीवनं...."
या भक्तिरसंपूर्ण गाण्याच्या..,पहिल्या ओळिपासून माझं मन तर एकदम, शालेय जीवनातल्या त्या लवकर सकाळी उठण्याच्या त्रासात, जो रेडिओचा प्रभातंगीतांचा सुखद सहवास असायचा , त्या काळात गेलं. कारण हे गीतंही प्रथम त्याच कार्यक्रमात कित्येकदा ऐकलेलं! त्यामुळे त्या आठवणी आधी जाग्या झाल्या..पण पुढे पहिलं कडवं झाल्यावर..,परत काकूनी धृवपदात..ती "घनःश्याम सुलोचनं.." या शब्दातली..."घनः श्याsss(आ)sssमं...सुलोचनं" ही जागा,इतकी भावपूर्ण फिरत टाकुन घेतली..की,आधी वाहव्वा म्हणणारे आंम्ही सगळे,पुढील गाणं जिवाचा कान करून ऐकू लागलो.
तुझ्या मूर्तीविणं..या डोळ्यांना,कृष्णसख्या रे..काहि दिसे ना। एकंतारी त्या..सुरात माझ्या,तुझेच अवघे..भरले चिंतन..॥..मुरलीधरं...घनः श्याsss(आ)sssमं...सुलोचनं
श्यामल तनुचा..तवं देव्हारा,भू ज्योतिला..माझ्या थारा।चिंतनात मी..रमते तुझीया,सोबत करं..टाळांची किणंकिणं..॥मुरलीधरं...घनः श्याsss(आ)sssमं...सुलोचनं
विषासंही तू .. अमृत केले,या वेडिला.. जीवन दिधले।हे उरलेले ..जीवीत माझे,तुला मुकुंदा..करिते अर्पण..॥...मुरलीधरं...घनः श्याsss(आ)sssमं...सुलोचनं...मी मीरा तू...माssझे जीवनं....,मुरलीधरं...घनः श्याsss(आ)sssमं...सुलोचनं..,मुरलीधरं...घनः श्याsss(आ)sssमं...सुलोचनं..............
काकूच्या गऴ्यामधे काय जादू होती ? मला कधिही कळली नाही. पण ती, तिच्या सुराच्या पहिल्या स्पर्शानीच ऐकणार्याला या-ऐहिकाच्या, पार पलिकडे नेऊन ठेवायची. काकानी गुरुजिंच्या मैत्रीचा फायदा उठवुन,चेष्टेपरि चेष्टा केली खरी..पण काकूनी त्यावर हे गाणं गायलं,आणि त्या चेष्टेचंही सोनं करून दाखविलं. गुरुजी देखिल भावंपूर्ण मनानी सगळं गाणं तल्लीन होवून ऐकत होते. एरवी, या पाठंशाळेसाठी वाहिलेल्या त्यांच्या रखरखीत जीवनात,असं एखादं गाणं, त्यांच्याही वाट्याला कधी आलं होतं? आणि येणारंही होतं.? ...ह्या पुढे?. ज्या माणसांनी, एखाद्या विशिष्ट हेतूसाठी स्वतःचं जीवन जगण्याचं एकंदरीतच सोडलेलं असतं..त्यांच्यासाठी आमच्या काकासारख्या कुण्यातरी माणसाच्या अगर प्रसंगाच्या अनुषंगानीच हे काहि क्षण आत्मंसुखाचे येत असणार. एरवी अश्यांना असली सुखं-प्राप्त करवून देण्याचा विचार, आपणा स्वार्थी माणसांच्या चिंतनात तरी येत असेल काय??? या विचारानी माझं मनं पुन्हा थोड्या अपंराधी भावनेत गेलं. आणि त्याच क्षणी माझ्या मनानी असा निर्णय घेतला,की आयुष्यात जर का अश्या त्यागपूर्ण हेतूनी काहि करायची वेळ आली..तर गणपति आधी मी माझ्या गुरुजी आणि काकुची मनात पूजा करीन..आणि मगच त्या कामाला सुरवात करीन. नाहितर आपल्या सारख्याच्यात हे बळं यायचं तरी कुठून?
काहि क्षण,या गांभिर्यपूर्ण.., परंतू तरिही एका निस्सिम आनंदात गेले. आणि मग आंम्ही सगळेच जणं 'परतीला निघणे' या मोडमधे गेलो. मग मात्र किश्या आणि सुर्या - दोघेही, सगळ्यांच्या सामानाच्या पिशव्या/ब्यागा त्या आमच्या मिनीट्रकात नेऊन लावणे. गुरुजी, काकू आणि सदाशिवदादासाठी स्पेशल रिक्षाचा इंतजाम करणे. आणखि कुणाकुणाच्या परतीच्या वाटेवरच्या प्रवासाच्या काय काय अडचणी असतील..तर त्या मार्गी लावणे. असल्या कामांच्या पाठीमागे गेले. आणि एकदाची ती सर्व आवराआवरी होऊन. आमच्या गाड्या सुटायच्या बेताला आल्या. किश्या सुर्या आणि माझी बाकिची सर्व मित्र मंडळी..त्यांच्या आणलेल्या वाहनांनी परतीला फिरली..आणि मग मला मात्र तो, मनाला जड होणारा- 'मुलिच्या पाठवणीचा प्रसंग' , नको नको म्हणता..आधीच, सारखा अंगावर येऊ लागला. आमच्या त्यांच्या गावात, अगदी कोकणातल्या भाषेत बोलायचच..तर खरोखर, हाकेचं अंतर होतं. पण शेवटी घराच्या अंतरापेक्षा-अंतरणारं घरं..,हा त्या नवंविवाहितेच्या मनाचा परिक्षा पहाणारा घटक अडवा येणार असतो ना? मग तो परिस्थिती पालटेपर्यंत तरी...यायचा चुकणार थोडाच? तो आलाच शेवटी.
आंम्ही सगळे जणं काकानीच दिलेल्या ऑर्डर बरहुकुम, भराभरा त्या मिनीट्रक मधे बसायला लागलो..आणि मांडवाच्या कडेनी ही...हिची आई..बाबा..काका आत्या मावश्या मैत्रिणी असे सगळेजणं रडवेले झालेले, आमच्या ट्रकापर्यंत आले. आणि मग माझ्या आईनी स्वतः पुढे होऊन, हिच्या आईला.."हे पहा...आता काळ बदललेला आहे..सून वगैरे म्हणायचं ते नात्यापुरतं...मी हिला सांभाळणार..ती माझ्या मुलिसारखीच की नाही? सांगा बरं. ? " असं बोलून खरच तो,पाठवणी करणार्या वधुमातेचा भार..,हलका केला. मग ट्रकात चढता चढता,पुन्हा हिला उद्देशून..हिच्या आईनी , "जरा शांत डोक्यानी रहा तिकडे गेल्यावर...कुणी एक म्हणालं,तर लगेच दोन म्हणायला जाऊ नको..(आता..!) " असे काहि शेवटचे उपदेश केले . ही पण सारखे डोळे पुसत..आईच्या दर वाक्यानंतर.."हो!"...."हो!"..असं करत होती. आणि ट्रक निघाल्या नंतर घराकडे जाता जाता...मंङगलाष्टकं संपल्या संपल्या, जो आंम्ही दोघांनिही पहिला नमस्कार गुरुजी आणि काकुला केला होता..त्यानंतरच्या गुरुजिंनी दिलेल्या आशिर्वादाचं, मी मनात चिंतन करित होतो..
========================================================

॥दंपत्यो: अविच्छिन्ना प्रीतीरस्तु॥"तुमच्या मधली प्रीती अविच्छिन्न राहो." भावार्थ तर कळला होताच..पण त्यातल्या प्रीती.., या शब्दाचा मतितार्थ कळण्यासाठी, मी माझ्या सुभगेसह..एका सर्वस्वी अनोळखी..परंतू जगण्याला नवी दिशा आणि आनंद देणार्या नव्या जीवनाच्या वाटेवर निघालो होतो.
========================================================
गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३५ (विवाह विशेष...-२)
असं म्हणून तिनी मला संथेतून-पौरोहित्यात आणलन...
पुढे चालू...
============================
वस्तुतः आमची मित्रमंडळी आणि मी स्वतः देखिल,या आदल्या दिवशी वांङनिश्चय वगैरे करण्याच्या विरोधी होतो. कारण किश्याच्या आणि माझ्या(ही) म्हणण्या प्रमाणे, 'हा वांङनिश्चय म्हणजे एकप्रकारे दोन्ही कुळांना सदर विवाह मान्य आहे ना? हे (पुरोहितानी) तपासणे आणि विवाहासंबंधीच्या सामाजिक धार्मिक आचाराची तिथे उभयतांकडून कार्यवाही करवून घेणे' ..यापलिकडे काहिही नव्हते. काका तर तिथे सुरवात होण्याआधीच,गुरुजी आणि सदाशिवदादा देखत सरळ म्हणाला...की, "ह्या वांङनिश्चयाची गरज काय अत्ता? बैठकित ठरले सगळे वाचे'नीच .मग परत कशाला..ही 'वाचादत्ता मया कन्या पुत्रार्थं स्वीकृता त्वया...।..'ची लुटुपुटुची लढाई? . हे सगळे त्या बैठकीतच करावे. उगीच परत तो मंगलंकार्यालयीन दिखाऊ पणा हवा कशाला? घरी लग्नाची देवदेवकं बसविल्यानंतर(म्हणजे शास्त्रानुसार विवाहसंस्कार-सुरु झाल्यानंतर..ज्याची देवक बसविणे,ही सुरवात असते.), परत अत्ता हा विवाहनिश्चितीचा हा तुमचा वांङनिश्चयीन विधी,म्हणजे जेवणात सुरवातीला वरणभातावर लिंबु पिळायचं र्हायलं म्हणून शेवट हात धुतल्यावर,केवळ रीत-पूर्ण करण्यासाठी पुन्हा एक लिंबु तोंडात पिळून घेण्याइतकं खुळे पणाचं आहे..."
काकाचा हा बाँब-असा पडल्यानंतर,सगळी तयारी झालेल्या मांडवात एकदम 'अता काय होणार???' या अत्यंतिक चिंतेचं वातावरण पसरलं. (वास्तविक काकानेही, "केवळ एकमेकास काहि आहेर वगैरे देण्याचे असेल,तर तेव्हढेच आदले दिवशी करायचे आहेत..." असं कलम त्याच्या आणि सदाशिवदादाच्या ठरलेल्या कार्यक्रम पत्रिकेत टाकलं होतं..पण आमच्या-त्याबाजुची मंडळी या निर्णयावर नाराज होती..म्हणून "हा विधी करवायचाच " असं त्यांनी एक लावून धरलेलं,त्यांचं नियोजन होतं.) मग काहि क्षण त्याच चिंतनीय शांततेत गेले. आणि मग आमच्या गुरुजिंनी काकाला बाजुला नेऊन , "सख्या...तुझी तत्व बरोबर असतात रे नेहमीच!,पण समाजंही त्यासाठी मनानी तयार असेल तर त्याचा आग्रह आपल्याला धरता येतो..आणि मगच उपयोग होतो...क्का....य?" असा मूळ भडकलेल्या अग्निचा, विवेकशास्त्रोक्त उपशमन करणारा प्रतिबाँब टाकुन सदर प्रसंग मार्गी लावला. शेवटी कशीबशी काकाने मान्यता दिली. आणि माझ्या खांद्यावर हात टाकत, "आत्म्या...मी तुझ्यासाठी गुरुजिंना आणवलं,पण ते लाभले मात्र त्यांना!..सालं,राजकारणात मुद्दा मांडायची-वेळ चुकली,तर खेळ समोरच्या पार्टिच्या हतात जातो...हे माझ्या लक्षात आलं नव्हतं!..पण तू लक्षात ठेव हो. कारण तू ज्या दुर्गेला निवडलाय्स..त्यात ही खेळी नेहमी लागणार आहे,हे नक्की!" असा मलाच उलट आशिर्वाद कम-टोमणा मारून तो तेथुन मग चालू कामाच्या नियोजनात-शिरला. आणि हे आणखि कमी की काय..,म्हणून तिथे (भू)मध्य-कोकणातल्या...सॉरी...कोकण(भू)-मध्यातल्या, एका अतिप्र-सिद्ध शहरातून आलेला 'हिचा' मामा, "ह्या: ... गुरुजिंनी मुलाच्या काकाला हरवलनीत एका झटक्यात!मायला.. दोन मिनटात ग्येम फिनिश केलनीत! अव्वल हो अगदी. गाव कोणतं हो मुलाचं?" असा तो ही दगड परत-मलाच मारून निघुन गेला. आणि किश्याही हरामी मेला, "काकचं तेल,आत्मूवर!" म्हणून तो गेल्यावर खदाखदा हसला. (
) मी मनात म्हटलं , "बरं झालं हा विधी होतोय ते...नंतर एकदा चौरंगावर
मलाच बसलेलं-बघितलन ह्या 'हिच्या' मामानी,की मग बोबडी वळेल मेल्याची!" ...
शेवटी ह्या एकदाच्या सर्व गदारोळा नंतर आमचा तो वांङनिश्चयाचा विधी सदाशिवदादाच्या खणखणीत मंत्रपठणाचा आनंद देत,शिस्तीत पार पडला. त्यातही शहरी भागात पूर्वीपासुनच फेमस झालेलं व्याहिभेट आणि सीमांन्तपूजन- हे अॅडिशन तर त्यातून काकानी बैठकिच्या वेळेलाच सगळ्यांचं अगदी समुपदेशन करून वगळलेलं होतं. त्यामुळे सर्वंकाहि सरळ एक तासात संपलं. आणि प्रांत कोकण असल्यामुळे जो वांङनिश्चय झाला,त्यातंही मान आणि पान हे ही कमीच असल्यामुळे तो ही नाहक वेळ टळला. या सगळ्या झटपट अवराअवरीमुळे काहि परंपरागतं मंडळी जरी नाराज झालेली असली,तरी बाहेर गावाहुन आलेली मंडळी 'अता...लवकर झोपायला मिळणार' , म्हणून सुखावलेली होती. पण "विवाह होण्याचा प्रांत असता को कणं ? तेथे कैचे व्हावे शीघ्र निद्रा-धारण?" , असं म्हणण्यासारखी परिस्थिती आमच्या मित्रमंडळानी आणि हिच्या मैत्रिणमंडळानी आणवली! म्हणजे , जेवताना समोरासमोर बसलेलो आहोत,याचा आंम्हाला चिडविण्यासाठी फायदा घ्यायचा विडा उचलल्या सारखीच मुद्रा करून किश्या आंम्हाला वाढायला आलेला होता. आणि खौटपणानी तिला (सगळ्यांच्या देखत!
) "दुर्गे....., तुजं संभाव्य पतिस भात वाढू की नुसतीच आमटी?" असे उघड
उघड दगड मारत होता. हिच्या मैत्रिणीही काहि कमी नव्हत्या.आणि असणार तरी
कश्या त्या? शेवटी हिच्या'च ना त्या..? त्याहि मग किश्याला 'आपण घरी रात्री
नक्की काय जेवता? तेच आणि तसेच वाढा' .. असे पलट वार करत होत्या. आणि
आंगण्यात चाललेल्या या पंगती-प्रपंचाकडे पाहून गुरुजी ,त्या घराच्या
पायरीवर बसल्या बसल्या हसत होते. मी बाकि हिच्या चेहेर्यावरच्या भावना
पाहुन...नंतर किश्याचा कुठे तरी ही गणपति करेल्,म्हणून चिंतेला आलो होतो.
शेवटी मित्रमंडळींकडून यथेच्छ चिडवाचिडवी करून झाल्यावर ,आमची ती जेवणे-संपली. आणि मग,आलेल्या नातेवाइकांपैकी कुणी पत्ते खेळायचे फड रमवतोय. कुणी पान तंबाखुत रमलाय. कुणी स्त्रीया आपल्या मुलांना झोपवतायत. तर काहि वयस्क आणि समवयस्क महिलांचे विवाहविधीकार्यकाळात होणारे विशेष संवाद कुठे कुठे ऐकू येतायत,आणि भटजीचं लगीन असल्यामुळे ,काहि खास संवाद ऐकू येतायत,..अश्या वातावरणात तो मांडव-भारला गेला.
त्यातले काहि विशेष आणि खास संवाद...
दल क्रमांकः-१ (वयोगट-४५ ते ५५..)
स्त्री१:- "काय गं? इथे आज इतके पाचपंचवीस भटजी काय गं करतायत?"
स्त्री२:-"अगं करतायत मंजे काय? तुला म्हैती नै? तो ही भटजीच आहे...ज्याच्याशी आपल्या वैजे'चं लग्न आहे...तो!"
स्त्री१:-"अय्या हो...............!??? मला वाटलेलं कोणतरी संस्कृत शिक्षक आहे (म्हणे!) "
स्त्री३:-" पण बरं नै का ते हल्ली!? पश्यापरी पैसा मिळतो,आणि किराणामाल पण निम्म्याहुन जास्त घरी येतो...(आयता!)"
(फुटीर)स्त्री४:-"आयता कसा हो? त्यासाठी लोकांना हवी तेव्हढी दक्षिणा द्यायची तरी सवय लावा कि तुम्ही.. असं वाटणार्या,लोकांनी!"
स्त्री३:-"अस्सं होय...? आपलं पण 'घर' भिक्षुकाचच वाटत?"
स्त्री४:-"भिक्षुकाच कशाला असा(य)ला हवं? नसलं तरी 'एव्हढं-सगळं' कळतच की...लोकांना!"
स्त्री२:-"असू द्या हो..पण मुलगा चांगला आहे....थोडा बुटका(?) असला तरी!"
स्त्री१:-"अगं बुटका कसा? चांगला पाच सव्वापाच फूट उंच आहे की?...मंजे मगाशी पाह्यल,तेंव्हा-वाटलं तरी तसच!"
स्त्री२:-"अगं बुटका म्हणजे तसा नै हो...आपल्या वैजेच्या मानानी बुटका!"
दल क्रमांकः-२ (इथे तिन अज्ज्या होत्या..म्हणून वयोगट:-साठच्या पुढे....!)
१:- "ह्यांच्यात कै देण-घेणं नैय्ये..म्हणतात"
२:"नाय्तं काय? तो मगाशी गर्गाचार्य नै पाहिलास काळी टोपिवाला...त्यानीच हे ठरवलयन (असं!)"
३:-"तो काका ना मुलाचा?..म्हायत्ये! ...पण जरा सुद्धा हौसमौज करु द्यायची नाही..म्हणजे हे लग्न समजायचं की ............ ...........?"
१:-"अहो...अभद्र काय बोलता अश्या कै तरी? काळाप्रमाणे बदलत जातातच सगळ्या पद्धती"
३:-"पण म्हणून इतकी काटछाट? विधी सुद्धा-सगळे केलनीत नै (त्यांनी!)"
१:-"नाय तं काय? ह्याच्यापेक्षा आंम्ही भातुकलीत सुद्धा बर्या वागायचो!"
दल क्रमांकः-३ (वयोगटः-२५ ते ३५..म्हणजे नवंविवाहिता!)
१:-(खांद्यावरच्या बालकाला थोपटत..)"हे विधिंचं कित्ती छान झालं नै...आज? सुटसुटीत एकदम. "
२:-"हो ना...देव करो,आणि त्या मुलासारखा काका,प्रत्येक घरात येवो!"
३:-"ह्ह्ही ह्ही ह्ही ह्ही.....मुला-सारखा नाही गं,मुलाच्या काकासारखा-काका..."
२:-"हो गं! कळतं आंम्हाला सगळ्यांना (तेव्हढं..)"
१:-"ए...भांडू नका गं. मला आपल्या वैजुची गंमत वाटते"
३:-"कसली......??? गं..............????????"
१:-"नै गं...मुलगा भिक्षुक असून, त्याला पसंत केलन..."
२:-"मं...........?,त्यात काय एव्हढं? आपली वैजू श्ट्रेट फॉरवर्ड आहे...म्हणून!"
१:-" ते म्हायत्ये गं...पण आपण तयार झालो असतो का?...मी सुद्धा (अश्याच..) एकाला नाही-म्हणाले होते"
२:-"माझ्या समोर आलं नाही तसं कोणी? नायतर मी ही 'हो'..म्हणाले असते.अगं...भटजी म्हणजे(ही) माणसच"
१:-"मी कुठे म्हटलं, दुसरे कोणी म्हणून..पण अगं...ह्या लोकांना अजुनंही जुनाट रहायची सवय असते,आणि इच्छाही. काहि जणं आयुष्यभर त्या धोतरातच रहातात. ... हे चुक नै का? कंडक्टरनी घरी आल्यावर(तरी..) ती खाकी कापडं काढयला नकोत!???"
३:-" हो ! हवीतच. ती काढायला हवीत्,आणि दुसरी घालायलाही हवीत...!"
१:-" श्शी............! अत्ता चावट बोलायचं काहि नडलय का?...काळवेळंही कळत नाही का हो?"
३:-" मी कुठे चावट बोल्ले? तुलाच ऐकू आलं असेल बहुधा!"
२:-"अगं..पण हल्ली (सुद्धा..) सगळीच भटं काहि तसली जुनाट र्हायलेली नैत. आपण गावात बघतो नै का? माझ्या दादाचा मित्र... तो जोशी...,तो तर टी शर्ट आणि जीन'ची पँट(पण..) घालतो. "
३:-"आमच्या हितला १,संध्याकळी... ते बर्मुडा का फर्मुडा घालुन ... कधी कधी पिऊन ग्गार-पण होतो मेला!...अणि वरनं म्हणतो, 'मी खरा ब्राम्हण आहे...म्हणून सूर्यास्त झाल्याशिवाय स्वतःलाहि अर्घ्य देत नाही'.........,अता बोला?"
१:-"ह्हो!... तुझं मेलं..तसल्यावरच लक्ष..."
२:-"ह्हो...कळलं कळलं...सगळ्यांचं(सगळ्यांना..),चला झोपायला चला...नायतं,भेटलो दोन दिवस,आणि भांडता आली आवस...असं होइल कै तरी...चला...चला...."
......................................................
बाबा तर त्यांना गर्दीमुळे येणार्या थकवेपणामुळे आधीच शेजारच्या एका घरात स्थानंआरक्षण करून झोपावयास निघुन गेलेले होते. आइ,काकू,ही, हिच्या मैत्रिणी आणि हिची आई ...अश्या सगळ्याजणी,एका खोलित..आणखि काहि बायकांना एकत्र जमवून- दागिने,बांगड्या,साड्या,मेहेंदी.., असल्या स्त्रीजातीच्या प्राचीन्,अर्वाचीन्,पुरोगामी अश्या हरेक जमातीतल्या महिलांना आवडणार्या विषयात रममाण झालेल्या होत्या. मग सदर कोला-हलातून, 'आपणाला निजण्यास शांतता लाभणेकरिता किमान रात्रिचे बारा वाजणे निश्चित आहे'....अशी खात्री पटल्यावर्,मी किश्या आणि आमची आलेली सगळी दोस्तकंपनी, त्याच गावातून जरा हिंडून पाय मोकळे करून आलो. आल्यावर पहातो,तर हिच्या त्या घरासह आजुबाजुची आम्हा उतारु-पक्षाची व्यवस्था केलेली सगळी घरं..एकदम कर्फ्यू लागल्यासारखी शांत! हा चमत्कार कैसा जाहला..? असे मनात म्हणत मुख्य घरापाशी आलो,तर तिथे आम्हा सगळ्यांची त्याच आंगण्यात निद्रा-व्यवस्था लावून देण्यात आलेली होती. आणि एका बाजुच्या कोपर्यात काका,गुरुजी,सदाशिवदादा...असे एकत्र बसून काहि तरी निवांत चर्चा करत होते. मग लक्षात आलं,की हा कर्फ्यू काकानी घोषीत केलेल्या कार्यक्रम पत्रिकेच्या भागानुसार होता! पण मग आंम्हीही त्यामुळे सुटकेचा निश्वास टाकला. आणि सर्व जणं झोपते जाहलो.
मला तर अशिही झोप येत नव्हती. एकतर नवख्या ठिकाणी गेल्यावर निद्रादेवी आमच्यावर बरेचदा रुसते हे एक कारण होतं,आणि त्यात गुरुजिंनी आल्या आल्या दिलेल्या आशिर्वादाचा अन्वयार्थ लावायला माझीया मनात सुरवात झालेली होती. त्यामुळे काहि केल्या झोपेची गाडी मला लवकर मिळत नव्हती. नंतर साधारण अर्ध्या तासात बाकिची सर्वजणं निवांत झोपली..पण माझ्याच दोन जागा पलिकडे झोपलेल्या गुर्जि आणि काकाचे खर्जात चाललेले संवाद मात्र, मला त्या शांत वातावरणात स्पष्ट ऐकायला येऊ लागले....
गुरुजी:-"सख्या...,मगाशी मी तुला जे काहि सांगितलं,ते फक्त प्रसंगावधान म्हणून हो. नायतर मनात धरून बसशील काहितरी."
काका:-"बंडू...मनात धरून बसायला मी आता तो राहिलेलो नाही...पंचवीस वर्षांपूर्वीचा! "
गुरुजी:-"हम्म्म...अजुन लक्षात आहे वाट्टं सगळं?"
काका:-"मग???, ते काय विसरणारं असतं का? पण माझं देखिल धर्मव्यवस्थेवरच्या रागाचं कारण,तुला वाटतं..तसं 'माझी अविवाहितता'..हे नाही"
गुरुजी:-"मग काय आहे? ..आणि अत्ता नसलं,तरी सुरवातीला काहि वर्षं तरी ते होतच! निदान तू ह्या एकंजाती संघटनेचं काम करायला लागेपर्यंत तरी नक्की!!!"
काका:-"हो...मी कुठे अमान्य करताय ते? माझं लग्न ज्या कारणामुळे तुटलं ते असो..पण अंतर्जातीय विवाह, हे आपल्या समाजिक आरोग्याकरता आणि एका चांगल्या मानवतावादी अभिसरणाकरता आवश्यक आहेत, हे तुलाहि आता तरी पटलं ना ? काळाची फळं चाखल्यावर!?"
गुरुजी:-" हो......! पण तुला तर अंतर्जातीय विवाहाकरता ,मी तुझ्या बापाचाही होकार मिळवून दिलावता ना? मग तूच तुझ्या...,- 'अपत्त्यांची जात संमिश्र लावायला हवी!' - या वेड्या हट्टापायी नाही म्हणलास,त्याचं खापर धर्मव्यवस्थेपुढे(च) का फोडतोयस?"
काका:-" हे पहा बंडू...माझं म्हणणं सरळ होतं..मी जर का त्या मुलिला तिच्या कुळातून उचलून आणायची हिंम्मत दाखवित होतो,तर तिच्याही भावकितल्या माझ्या बाजुनी येणार्या सर्वांनी माझं म्हणणं मान्य करायला पाहिजे होतं...'अपत्त्याची जात संमिश्र-लावायला देण्याचं!'... त्याला तेच लोकं नाही म्हणाले,म्हणून मी नाद सोडला. "
गुरुजी:-" तरिही सख्या..,तू गाढवपणा केलास..असच मला आजंही वाटतं!"
काका:-"गाढवपणाच म्हणणार तू...अरे ती मुलगी नाही तर काय मी तिच्याच वाचून अडून बसत नव्हतो. पण एकदा लग्न अंतर्जातीयच करायचं म्हटल्यानंतर सगळीकडे तोच तो प्रश्न यायला लागला... कधी आमची लोकं ऐकेनात्,कधी त्यांची. सगळ्यांचा आपला एकच आग्रह...अपत्यास जात बापाचीच लावायची.. मग आइची काय...ह्यांच्या फो&%$@च्यांच्या... ह्याच्यात घालायची??? आणि जात संमिश्र-लावली नाही,तर अंतर्जातीय विवाहांचे सामाजिक फलित काय???...हे सांग पाहू मला?"
गुरुजी:-" सख्या...,तुझा सात्विक संताप मलाहि कळतो..पण म्हणून स्वतःचं आयुष्य जाळून घेणं..हा काहि त्याचा पर्याय नव्हे."
काका:-"बंडू..........मी माझं आयुष्य जाळून घेतलं,वगैरे काहि तितकंसं खरं नव्हे. मी आपल्या समाजाच्या आणि त्याही पेक्षा सरकारी धोरणाच्या विचित्र पणाला कंटाळलो..एव्हढच खरं आहे. अरे....,लोकं माझ्या अपत्यास माझ्याच जातीचं मानणार्,हे ठीक.पण आपल्या घटना-समतावादी-सरकार दरबारी तरी ,अंतर्जातीय विवाह करणार्यांच्या अपत्याची जात संमिश्र लावण्याची सोय निर्माण करायला हवी कि नको? समतेच्या मार्गातलं...हे केव्हढं मोठ्ठं हत्त्यार आहे!!!? दोघांचं पोरं..आणि जात मात्र एकाचीच..हा कसला निसर्गविरोधी आडाणचोट मक्तेदारपणा??? धर्मव्यवस्था आणि सरकार व्यवस्थेचाही!...लोकांकडेही हरलो,आणि सरकारदरबारिही हरलो...म्हणून मी चिडलो...आणि जी गोष्ट एका अपेक्षित फलप्राप्ती साठीच करायची...,ती मिळत नाही..म्हटल्यावर हा विवाहाचा नाद सोडला!"
गुरुजी:-"सख्या...हाच तो वेडेपणा आहे...तू जे तत्वात मिळत नव्हतं,ते व्यवहारात मिळवू शकला असतास...हे मी तेंव्हाही तुला सांगितलं होतं...आजंही सांगतो आहे. अरे लोकांकडून आणि सरकारकडून..तुला अपेक्षित प्रतिसाद नाही मिळाला..तर नाही मिळाला,पण तुझ्या अपत्त्यांना तर तू सांगू /शिकवू शकला असतासच ना..,की तुम्हाला कोणिही तुम्ही-कोण???,असं विचारलं..तर उदाहरणार्थः- आंम्ही ब्राम्हणकुणबी,..म्हणजेच ब्राम्हणआणि जि-ती आइची जात..असेल ती!..., असं उत्तर लोकांच्या कानी,त्यांनी आयुष्यभर नसतं का घातलं?"
काका:-" मायला...हे बाकि खरं आहे रे!"
गुरुजी:-" आणि लोकांना असं ऐकायची सवय-लागणं,हेच तुझ्यामाझ्या समाजसुधारणेच्या मार्गातलं...पहिलं हत्त्यार नव्हे का? खरी सुधारणा ही नेहमी लोकंसिद्धमतातून चटकन आणि शाश्वत होते,हे तुमच्या सुधारणावाद्यांच्या लक्षात कसं येत नाही? वाईट श्रद्धा मोडायला कायदा-करावा,पण चांगल्या नवंश्रद्धांच्या निर्मितीकरिता लोकमतात हळूहळू रुजेल..असं कृतीशील बीज पेरत रहाणं...हेच हितावह आहे..नव्हे का??? शिवाय,वारंवार ऐकल्या शिवाय खोटच काय?, खरंही पटत नाही लोकांना. म्हणूनच मी म्हणतो ना...पटलं,तरच ते-खरं!!!!....क्का......य!???"
काका:-" होय रे..होय!"
गुरुजी:-"मग खुळ्या माणासा...अजुनंही ज्यांनी कोणत्याही कारणानी अंतर्जातीय विवाह केलेत,त्यांना तुमच्या चळवळीचा वापर करून...हे जे मी म्हणतोय ते पटवून द्यायला सुरवात कर. त्यांच्या मुलांना,कुणी विचारलं-की आईबापाची जात एकत्र सांगायला..लावायची प्रथा निर्माण करं..याला तुमच्या एकजाती संघटनेचं सामाजिक मूल्य बनव. किमान तुमच्या चळवळीत जेव्हढ्यांनी असे विवाह केले आहेत...त्यांना तरी हे करायला लाव. 'त्यांना' तरी अवघड नाही ना हे!? हॅ..हॅ..हॅ..हॅ..!"
काका:-"बंडू.... हळू हस...अरे, आपल्या आजुबाजुला लोकं झोपली आहेत..उठेल कि कुणी दचकून!"
गुरुजी:-" (मंद हसत...) अरे..निद्रेतून-जागं करणे..हेच तर तुमच्या त्या सामाजिक चळवळ्यांचं काम आहे ना..ते आज माझ्याहातुन अत्ता एव्हढं तरी होऊ दे...,म्हणजे आजपासून मि ही आतुन-तुमच्यातलाच!क्का....य?"
काका:-(मंद हास्य करीत..) "बंडू...आज मी हरलो,मला खरच क्षमा कर...!"
गुरुजी:-" बरं बरं...असू दे हो...असू दे. आता उद्या पुतण्याला आशिर्वाद देताना..असच तुझ्यासारखं जागं-कर..,म्हणजे झालं...क्काय????"

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३४ (विवाह विशेष...)
आता दे बरं मला टाळी!"
पुढे चालू...
================================== आणि मग,झाली...अखेर ती बैठक की कायशी म्हणतात ज्याला जुन्या श्टाइल मधे.., ती बैठक झाली. फक्त उलट आश्चर्य म्हणजे, बाबां ऐवजी आज्जीच आमच्या विवाहास 'कमी वय' म्हणून 'अजुन चांगली(?) दो.......न वर्ष जाऊ देत,मग करा लग्न' असा आक्षेप घेत होती. पण शेवटी काकानी आज्जीला. "आगो मायो माझे... हा नुकत्याच पंचविशितला आहे. म्हणजे फार काहि घाइ होत नाहिये तुला वाट्त्ये तशी . आणि त्या पोरिचे म्हणशील तर मी जेव्हढे तिला ओळखले आहे,त्या नुसार तिचं अत्ता जे वय आहे..ते जन्म वय आहे फक्त. बाकि पोर डोक्यानी आपल्या आत्मू पेक्षा चांगली ५ वर्षे मोठी आहे. कळ्ळं???, आणि आपली परिस्थिती काय इतकि हलाखिची आहे का? कि जरा कुणाचा भार पडला कि डबघाइला आलो...अं...?" यावर आज्जी , " हम्म्म्म...ठिक आहे मग. आणि खरेच तू म्हणतोस तशी असली ना ती पोर तर मग होऊच दे . नैतरी आपला आत्मु तसा खुळाच आहे की! सुधारला थोडा ..,तर लवकर(च) सुधारेल तिच्या नादानी!" असं म्हणून निष्कारण शेवटी मला दगड मारलन. (
)
ही बातमी आमच्या वेदपाठशाळेतल्या मित्रगोटात न फुटती तरच नवल होतं. माझं (हे) लगिन ठरलं ,म्हणजे जणू काहि मी प्राचीन काळातल्या सारखं 'तिजंला रथातून पळवून' वगैरे आणतोय अश्या आविरभावात मित्रांचे घरी फोन येऊ लागले. एकदा तर एका कामात सगळ्यांनी मिळून मला दुर्गे-दुर्घट-भारी...तुजविण संसारी ह्या आरतीचं विडंबन हताशी घेऊन असं काहि छळलं की मी खरच एक दोघांवर चिडलो.
वैजु तुजविणं आत्मू दुर्मुखं संसारी,असारं वाटे जगं हे तुजविणं त्या-भारी।
यारी यारी आमची किती पुरते सारी,तारी तारी तूची आत्मू ला तारी... ॥भिजंगौली भिजंगौली...
भिजंगौली भिजंगौली... ये आत्मू-सदनी...,लवकर लवकर त्याला दे तू सं-जिवनी...भिजंगौली भिजंगौली॥धृ॥
असं शेवटी तिच्या गावाचं नाव(भिजगहुली..)-यातलं -भिजंगहुलीगाववाली...अश्या शब्दसंचयाचं शॉर्ट(मारलेलं) ,ते भिजंगौली...नामक-व्हर्जन..धृवपदाला जोडून,त्याची पुरती वाट लाऊन टाकली. आणि पुढे कहर म्हणजे ...
आत्मूसाठी पहाता-तुजंऐशी नाही,मनात असता तू-ची बोलतो का काहि?
वरती विवाद करितो पण त्याला घाई,सरते किशोर वयं हे-उरली लवं-लाहि....॥भिजंगौली भिजंगौली..॥१॥
असं करून माझा साद्यंत पंचनामाच केला जणू...पुढे मग मात्र अवरा आवरी सावरा सावरी केली थोडी...
प्रसन्न वदने प्रसन्न दे त्याला आशा,तुजविण कोणं- ही त्याला शिकविलं -ती भाषा?
अगं ए..तुजं हाती त्या आत्म्याची रेषा,आंम्हाला नाहि हो नुसत्या चौकश्या॥ भिजंगौली भिजंगौली..॥२॥
अशी तिला..(म्हणजे आरती'ला..) वाटेला लाऊन मोकळे झाले हलकट मेले सगळे....त्या दिवशीचा त्या कामातला यजमानंही ,आंम्ही नाश्ट्याला मधे-थांबलो असताना 'हे काय चाल्लय???' म्हणून तक्रारीला आला नाही. नंतर मला कळलं ,की त्याला सदाशिवदादाच्या नकळत कोणितरी फूस लावली होती..आणि तो हि या आनंदी गोंधळात सामिल झाला होता.
मी मात्र मनात विचार करत होतो, की हे काम कुणाचं??? कारण आमच्या चालु-टीम मधला तर कोणि म्हणजे कोणिही कविवृत्तीचाहि नाही आणि वृत्ताचाहि नाहि. मग हे डोकं कुणाचं.? पण त्यात एक दिवस दुपारि घरी निवांत पडलो असता माझा परमंमित्र किश्याचा फोन आला..आणि अभिनंदनाचे बोलता बोलता मधेच मला.."आता आंम्हाला कळलय तू न सांगताहि.." मी मधेच, "अरे मी कळविणार होतोच्,पण निश्चिती झाल्याशिवाय कसं...?" म्हणे पर्यंत ..परत मला तोडत.." पण तुझ्या बाकिच्या तिथल्या मित्रांना सरळ सांग ..नायतर कोणि तरी चिडवेल तुला ..आणि ओवाळेल आरती एखाद दिवस तुझी -खतरनाक!" असं बोलून जाणिवपूर्वक स्वतःचे नॉक खुपसता झाला. तेंव्हा माझ्या डोक्यात प्रकाश पडला.. की आरती रचून यांना पुरवणारा हाच तो हरामी मेला. कारण पाठशाळेत मंत्रांची विडंबनं, अगदी बेमालुम उतरवणारा माश्टर हाच होता. म्हणजे पंचसूक्त पवमानातल्या आखुंची देवदेव सोमा चं राखुंडी दे रे दे रे सोमा (दात घासायला!) हे... तर सप्तशतीतल्या -जानता जानता वापि बलिपूजां यथाकृतम चं, आमच्यातल्या झोपाळू जोश्यावर -जागता जागता झाली इती-पूजां जोश्या कृतम असं करून-मारणारा तो ...वि डंबक स्वामी! मी त्याला मग.."लग्नाला आपण स्वतःच येणार की विडंबन पाठवताय...आपलं?" असा उलट दगड हाणल्यावर राक्षसासारखा खदाखदा हसला. पण काहि झालं तरी मी किश्या शिवाय सोडमुंजिलाही उभा रहाणार नव्हतो,तर लगिन तर दुरचीच बात. किश्या म्हणजे पाठशाळेतल्या माझ्या अट्टल मित्रांपैकी एक. शाळा सुटताना मी त्याला "मेल्या बोंबल्या...भेटशील ना रे परत.........???" म्हणून जी मिठी मारुन रडलो होतो. की त्यानी मला तितक्याच जोरात भेटत.. पाठित एक जोरात थाप मारल्या सारखं करून...सोडवून घेतलं...आणि जाता जाता.."आत्म्या हराम्या...रायगडातून देवगडात येश्ट्या येतात...लक्षात ठेव हो.." म्हणून मोठ्यांदी रडत रडत ओरडत गेला होता.
मग घरून सगळ्यांना रीतसर आमंत्रणे वगैरे पाठवणे सुरु झाले. अगदी मुहुर्त होणे.ग्रामदैवतांना पत्रिका ठेवणे असे सर्व सुरु होऊन आमच्या त्या घराला आणि पुढे पडलेल्या मांडवाला...परिपूर्ण मंगल सोहळ्याचे रूप आले.चारही बाजुनी आम्रपल्लवयुतं झालेला ,तो मांडवं..त्याच्या एंट्री-ला केळीचे घड आणि केळफुलासह लावलेली ती दोन खांबी कमान. त्याखाली ते नित्य सारवून आणि रांगोळ्या घालून -रेडी-केलेलं आंगणं. असा माहौल होऊन बसला. मग समावर्तनाचा..म्हणजे सोडमुंजिचा दिवस उगवला.. आणि त्याच सकाळी सकाळी माझी लाडकी काकू,सदाशिवदादा, आणि त्यामागुन किश्याही आपल्या लव्या-जम्या सह डेरे दाखल झाला.त्यात इतर मित्र-मंडळिही जमत होतीच. पण जसे आमचे नातेवाइक आणि सखारामकाकाचे खासमखास मित्र येऊ लागले,तशी मग आमच्या त्या घराची खिडक्या दारंही हसू लागली. जुनाट झालेल्या कौलांमधूनंही आनंद बरसू लागला. आणि विवाहाच्या आठवडाभर आधी आमचं घर एका नविन नात्याच्या स्वागताला तयार झालं. एकतर कुठेही विवाह .., ही घटना निश्चितच आनंददायक..पण जर त्यात तो खेडेगावातला विवाह असेल..तर आजंही सर्व गाव नाही म्हटलं,तरी किमान त्या घराच्या आजु बाजुची सगळी घरं तरी त्यात मनानी सहभागी असतात. मग लग्नाचं घर..हे मेन पीच असतं आणि आजुबाजुची पाचसहा घरं हे त्या पीच भोवतीचं ग्राऊंड...(त्यांच्यात हेवे दावे असले तरी!)
मग पहिली आली सोडमुंज! पण ...हा संस्कार म्हणजे काकाच्या म्हणण्यानुसार केवळ-गृहस्थाश्रमाचा दरवाजा..त्यामुळे त्याचे विधी करण्यापेक्षा 'उपदेश-सांगणे' महत्वाचे!. मग आमच्या सगळ्या कार्यक्रमाची धुरा आमच्याच सदाशिवदादावर सोपविलेली असल्यामुळे, काकानी त्याला सोडमुंजीपासून ते विवाहापर्यंत सगळ्या विधींमधे कशाकशाला महत्व द्यायचं? टाळायचं काय? सोडायचं काय? शिवाय नविनंही त्यात कुठे काय अॅड करायचं..?,इत्यादी सविस्तर चर्चा करुन सांगितलन. त्यादिवशी सदाशिवदादा आणि किश्यानी काकाच्या सांगण्यानुसार माझ्याकडून ती सोडमुंज-करवून घेतली. हो करवूनच. कारण एकिकडे त्याचे उद्देश सदाशिवदादा संस्कृतातून-म्हणत होता..आणि दुसरिकडे काका आणि किश्या ,मुद्दाम सगळ्या आलेल्या लोकांना बोलावून त्यांच्यादेखत माझ्याकडून ते उद्देश-आदेशा सारखे पढवून घेत होते.
काका:- "म्हण..आत्मू..म्हण.,सगळ्यांच्या समोर-मोठ्यांदी,..'मी अश्वक्रीडा..म्हणजे आजच्या काळातली ती तुझी बाइक...ती चाळे करीत यापुढे आजच्या दिवसापासून चालवणार नाही... मी द्यूत खेळणे...म्हणजे (सह)जीवनाचा-जुगार होइल..अश्या तर्हेनी कुठेही कध्धिही वागणार नाही. .. न सांगता प्रवासाला किंवा अज्ञात स्थळी जाणार नाही.'... " आणि हे चालू असताना मधे किश्या मेला हरामी..."म्हण...जलक्रीडा...म्हणजे पावसाच्या पाण्यात-सुद्धा खेळणार नाही,मग नदी समुद्र..तर लांबच! "... "गबाळा वागणार नाही..दर तीन दिवसाला दाढी करेन..रात्री उशीरापर्यंत मित्रांबरोबर रामाच्या देवळाबाहेरील पारावर चकाट्या पिटत बसणार नाही. ..सकाळी वास्तुशांतीला-जाताना नेसलेलं धोतर..संध्याकाळी कुणाच्या वांङनिश्चयाला(साखरपुड्याला)-जाताना , तेच उलट करून नेसणार नाही!" असली वाढीव कलमे-त्यात टाकत होता. उपस्थित नातेवाइकंही ही असल्या तर्हेची जबानी-घेतल्यासारखी सोडमुंज प्रथमच पहात होते. मग सगळे विधी संस्कार काकाला हवे तसे "कडक" पद्धतिनी झाल्यावर मला जरा सुटल्यासारखं वाटलं. आता लग्नानंतर मी काय ठरवून वाइटच वागणार होतो का? मग ही परेड कशाला? असले विचार माझ्या मनात येत होते.मग सदाशिवदादाला दुपारच्या जेवणानंतर मी गाठलं ..तेंव्हा तो बोलता जाहला.."अरे आत्मू..तुझा काका आहे ना, तो पक्का प्रबोधनाचा जीता जागता..करता करविता संत आहे रे संत! . धर्मातलं चुकिचं तो सगळं टाळतो..पण त्याचे जागी आवश्यक आणि काळाला लागू पडणार्या मात्रा शोधण्यात आणि त्या योग्य जागी लावण्यात मात्र तो , आपल्या शास्त्रीपंडितांचाही बाप आहे बाप! ..तेंव्हा अत्ता विचार करू नकोस. आणि लक्षात ठेव की कसोटीच्या क्षणी हे तुझ्या काकानी करविलेले असले संस्कारच तुझ्या कामी येणार आहेत."
शेवटी एकदाची ती सोडमुंज जाहली...आणि मग ग्रहमख वगैरे पार पडल्यावर तो विवाहाच्या आदला दिवस उगविला.. वांङंनिश्चयाचा! आता जिथे लग्न लावून घ्यायचं..तो मुलिचं घरं..नामक प्रकार अगदीच शेजारच्या गावातला असल्यामुळे...दुपारची जेवणे वगैरे अवरून..आमचे हे छोटे वर्हाड दोन मोठ्या - मिनी ट्रकातून पल्याडच्या गावला निघालं. आंम्हाला मिनिबसच काय? अगदी महामंडळाची येश्टी-करणं जरी परवडणारं असलं..तरी आमच्या काकाश्रींच्या नियोजनाबाहेर पाऊल टाकायची कुणाची काय टाप होती? काकाचं म्हणणं म्हणजे-"बडेजाव,मिरवामिरवी याच्यावर वायफळ खर्च करण्यापेक्षा जस्तीत जास्त साध्या आणि सोप्या पद्धतिनी ह्या गोष्टी झाल्या पाहिजेत.आणि मग वाटलच..कुणाला तर त्यानी तो वर-पैसा एखाद्या सामाजिक हितवर्धनाचे काम करणार्या संस्थेस दान करावा..आणि समाज ऋणातून मुक्त होण्याचं खरं पुण्य (वाजवून घेऊन!) गाठिशी बांधावं..अगदी कोर्टम्यारेज केलं...तरी!"
मग आस्ते आस्ते..आंम्ही डांबरी रोड सोडून त्यांच्या गावच्या त्या छोट्या लालमातिच्या रस्त्याला लागलो. आणि जरावेळानी ग्रामपंचायत भासावी, अश्या एका जुनाट घरट्या-जवळ...मु.पो. भिजंगहुली..लो.सं.-१०३६... ,अश्या दिसलेल्या त्या हिरव्या पाटीजवळ थांबलो. हे तर आमच्या गावाहुन लहान गाव..पण मोठं सुंदर आणि टापटीप होतं. अगदी सार्वजनिक नळंही जागच्या जागी होते...पाणि येत होतं की नाही? ते भगवंतास ठाऊक..पण होते...असल्यापासून तिथे ..दिसत तरी तसच होतं. मी त्याच नळकोंडाळ्या जवळ गाड्या-रिकाम्या होइपर्यंत ताटकळत होतो..पण तेव्हढ्यात आमचा किश्या आणि मागून आमच्या भट ग्यांग मधली पाच पंचविस मित्र मंडळी..कुठून तरी एका ब्यांजोवाल्याला हताशी घेऊन तिथे ओरडत गिल्ला करतच आली. आणि काका काय म्हणेल? इत्यादिची अजिब्बात पर्वा न करता मला खांद्यावर घेऊन त्या ब्यांजोवाल्याला ,चालू शिनुमातली गाणी वाजवायची ऑर्डर देऊन..माझी एकंदर वरात-काढायला सुरवात केली मेल्यांनी! एकिकडे मी मनातून सुखावत होतो...पण दुसरीकडे काका कोणत्याही क्षणी येऊन हे सगळं-बंद पाडेल..आणि दोस्तांची प्रचंड नाराजी होइल ,असं भयंही मला वाटत होतं. पण त्या दिवशी त्या ब्यांजोवाल्यालाहि नेमकं "तू...मेरी जिंदगी है..तू...मेरी आशिकी है...तू ही प्यार तू ही चाहत्,तू ही बेखूदी है...तू...." हे गाणं का वाजवायला सुचलं? कोण जाणे...? आणि मग काका मधे येऊन यांच्यावरचा राग त्याच्यावर काढत...त्याला एकदम.. "आरे फोकनिच्या... हे सुतकी तोडीचं गीत काय वाजवितोस अश्या प्रसंगी...? जरा ह्या प्रसंगी म्याच होइल असलं काहितरी खरड तुझ्या त्या तारा-यंत्रावर!" असं सुनवून गेला. मग काय? हा हरितं कंदिल हाती मिळाल्यानंतर ,आमच्या दोस्तं कंपनिनी त्या वाजविणार्यां समोर, तोंडात चांगल्या नोटाबिटा घेऊन नाचवित नाचवित आमची वरात...दोन गल्या पलिकडे असलेल्या ,त्यांच्या घरापर्यंत नेली.
मग आंम्ही सगळे त्या ग्राम पंचायती पासून निघालेले-पदयात्री आमच्या सगळ्या माणसांसह त्यांच्या आंगण्यात मांडवाखाली विसावलो. आणि जरावेळानी तिथेच (फक्त..) वांङनिश्चय कुठे होणार नक्की म्हणून मीच नजर फिरवू लागलो..तर आत ओटीवर एका खांबाला पाठमोरे निवांत टेकुन बसलेले एक वयोवृद्ध मला दिसले. मी म्हटलं...कोण असेल हे? पण माझा अंदाज तसाही चुकलेला नव्हताच. ते होते चक्क माझे गुरुजी! मग मला नंतर कळलं,की काकानीच ही सरप्राइज गिफ्ट..माझ्यासाठी नियोजित करून ठेवलेली होती. कारण गुरुजी तसे कधिही कुणाच्याही लग्नांना आदल्या दिवशी तर सोडाच,पण मुख्य दिवसालाही सकाळपासून वगैरे हजर रहात नसत. आलेच तर फक्त मुहुर्ताला यायचे,आणि केवळ आशिर्वाद देऊन...पुन्हा परत.कारण पाठशाळा कधिच -तशी सोडायची नाही..हे जिवनमूल्य! मग हा चमत्कार घड्ला कसा? तर त्याला काकू फक्त कारणीभूत..दिसत असली,तरि... पुढचा सगळा खेळ काकानीच -खडा टाकून काकु कडून घडवून घेतलेला होता. त्यामुळे कर्म काकुचं असलं तरी गुरुजिंना शाळेतून-बाहेर काढणे..याचा कर्ता काकाच होता. (शेवटी ते त्या संघटनेचं जितं जागतं व्याकरणच कि हो! ) काकूनी मग गुरुजिंना , "यावेळी तुम्ही तिकडे संध्याकाळला मला दिसला नाहीत्,तर मि तशीच रात्रिच्या गाडीने परतेन!" असा जवळ जवळ दमच भरला होता! मग गुरुजी न येऊन करतात काय बिचारे?
मग मात्र माझ्या आनंदाला पारावार उरला नाही. मी धावत धावत गेलो, आणि तिथे विसावलेल्या माझ्या गुरुजिंच्या पायावर डोकं टेकवून आनंदाश्रूंना वाट करवून देता झालो. मग मला प्रेमानी पाठिवरून हात फिरवीत..गुरुजिंनी उठवलं..आणि मला " हे बघ आत्मू..आता तुझी एका सर्वस्वी नव्या जीवनाला सुरवात होणार आहे. तेंव्हा यालाही जर जिंकायचं असेल,तर याला आपल्या शिक्षणातली-संथा-मानायला लाग... सहजीवनातल्या अनुभवातून दरंरोज-मिळणारी संथा...तुकड्या तुकड्यानी मिळवायची,आणि वाक्य वाक्य जोडून घोकत रहायचं रोज..म्हणजे एकेक अध्याय मनात पक्के उतरत जातात. परिक्षा तर दररोजच होत असते.आपलीहि आणि आपल्या सहचारिणीचिही! तिथेही न भिण्याचा नियम पाळायला शिकलं,की मग मार्क कमी जास्त कसेंही पडले,तरी माणूस त्यात फेल-जात नाही....क्का......य?"
हा उपदेश होता की आशिर्वाद? हे त्या क्षणी कळलं नाही मला. पण मला आज मिळालेली ही आयुष्यातल्या महत्वाच्या टप्यावरची ,एक अत्यंत मौलिक आणि शाश्वत संथा आहे..हे मात्र त्याक्षणापसूनच उमगायला लागलं होतं. मी ती वाक्य ऐकत गुरुजिंसमोर डोळे मिटून तसाच बसलेलो होतो.आणि मागुन येऊन मग मला अचानक काकूनीच जागं केलन. "अरे आत्मू..आता जरा ध्यानातून बाहेर ये...आणि तुझ्यासाठी जे ध्यान तिकडे आत डोळे-लावून बसलय ना? त्याच्यासाठीच्या तयारीला लाग..जा .. आवरायला घे त्या शेजारच्या घरात जाऊन... जा!" असं म्हणून तिनी मला संथेतून-पौरोहित्यात आणलन.

गुरुजिंचे भावं विश्व! भाग- ३३
मला भेटलेला देव नक्की कोण???..............असुरेश्वर? की तो धनगर???
पुढे चालू...
================================
त्या कार्यक्रमा नंतर घरी आलो खरा.पण खरा कुठे??? खरा तिकडेच राहिलो होतो. मन थार्यावर रहात नव्हतं. सरळ जाऊन आईला विचारावं,तर तिचा गैरसमज होइल की काय? ही भिती. मग कुणाकडून तरी तिकडचा पत्ता काढावा, तर ज्यांच्याकडून पत्ता काढीन अशी खात्री वाटली ते गावातले मित्र, एकजात सखाराम काकाला टरकणारे! त्यामुळे तिकडनंही काहि कळायची आशा संपुष्टात. शेवटी एक दोन दिवस असेच गेले,आणि मी "होइल पुन्हा जेंव्हा भेट तेंव्हा बघू!" ,असं म्हणून मनातल्या मनात विषय टाळू लागलो.पण नंतर कुठेही कामास गेलो,की मन काहि केल्या कामात रमे ना! ही नको ती अवस्था चालुच राहिली.मला नेमकं याचच भय होतं,कारण काका असल्या गोष्टी एका झटक्यात पकडणारा..त्यामुळे मी शक्यतोवर त्याच्या समोर जातच नव्हतो. आणि एक दिवस होऊ नये ते घडले. आमच्या पलिकडच्याच अगारात एकांकडे श्राद्ध -चालवायला गेलेलो असताना..नेमका तिथे सखाराम काका येऊन टपकला. काय? कसे? समजायच्या आत..यजमानच म्हणाले..."आज जेवायच्यातल्या एका ब्राम्हणानी दांडी मारून आंम्हाला अगदी अपेक्षित पुण्य गाठिला मारुन दिलन!चक्क क्रांतिवीर सखाकाका लाभले हो..त्यामुळे. " मला काहि हा गोंधळ झटकन उलगडे ना. मग काकाच मला म्हणाला, "अहो आत्मूभट. गोंधळू नका हो असे. ह्यांनी श्राद्धाला सांगितलेल्या दोघांपैकी एकानी अचानक दांडी-दिलिन्,आणि मी नेमका हे लोकं उतरणार त्या श्टॉपवर आमच्या संघटनेचं प्रचार पत्रकांचं पार्सल घ्यायला थांबलेला. तिथे हा सर्व प्रकार ह्या आलेल्या एकाकडून समजला.आणि मग 'श्राद्धाची जेवत्या ब्राम्हणाची जागा काय वाट्टेल ते झालं, तरी खाली र्हाता कामा नये' या-आमच्याकडल्या नियमाप्रमाणे आलो इकडे.आता ज्यानी दांडी दिल्येन..त्याच्यापाठी आज संध्याकाळ पासून जाणार मी दांडा घेऊन... ह्या..ह्या..ह्या...मग??? फो%$#@चा श्राद्धास दांडी मारतो म्हणजे काय? दुसरीकडेच कुठे गेला असेल ना..जास्तीचं गवत चावायला! मग??? .. तसं असलं,तर मग हण्णार त्याला.नंतर,पौरोहित्य आणि बेइमान निर्लज्जपणा.., ह्यातला फरकच त्याच्या ध्यानी येइल. काय हो यजमान? बरोबर ना?"
हा संवाद ऐकत..मी आपला श्राद्धाची पूर्वतयारी करण्यात मग्न होतो. पण काकाचं हे असलं बोलणं आज मी नीट ऐकत नाहि आहे.हे जसं त्याच्या तिथेच लक्षात आलं,त्याहुनंही माझं कामात नीट मन लागत नाहिये..हे त्यानी जाणलनच. मला मात्र मनात..आज घरी जाता जाता काका आपली भरपुर शाळा-घेणार अशी जबरदस्त भिती वाटायला लागली. मी भरपूर एकाग्रचित्तानी ते काम कसंबसं पार पाडलं.आणि नंतर तिथेच थोडा जेवुन आधी काकाला टांग द्यायचा प्रयत्न केला..
मी:- काका..आईला सांग,की मी जरा पलिकडच्या गावात एका मित्राकडे चाललोय . संध्याकाळी येइन.
काका:- ...... अस्सं होय. बरं..बरं.. जा हो जा.
या सहज मिळालेल्या परवानगीमुळे मी आधी निश्चिंत झालो. पण नंतर माझ्या फेवरीट एकांती जागेवर पोहोचे पर्यंत मनात हा विचार येत राहिलाच,की काका एव्हढ्या सहज 'जा...' कसे म्हणाला? पण कसलं काय? मी गेलो ते डायरेक ज्जेट्टी अलिकडल्या माझीया निवांत-पारी..तिथे एका वळणावर थोडा आत एक पिंपळाचा छोटासा पार होता. बाजुला गुरं पाण्याला येतील, असा एक पाणवठा .पाऊस वजा जाता एरवी तोही शुष्कच असायचा.पण आजुबाजुला गर्द झाडी आणि थंडगार सावली होती. दुपारचं तर तिकडे कुण्णीही फिरकायचं नाही. (कारण.., तो खास-मुंजा'चा पिंपळ..अशी त्याची ख्याती) मी आपला निवांत गाडी बाजुला सोडून तिथे पारावर येऊन विसावलो. काहि वेळ मनातले विचार एका जागी येण्यात गेले. आणि तिथेच थोडा वेळ काढून परतावं असं वाटे वाटे पर्यंत, मागच्या एका पायवाटेनी साक्षात सखारामकाका भुतासारखा तिथे समोर येऊन उभा राहिला! आणि जवळ आल्यानंतर त्यानी माझ्याकडे ज्या मुद्रेनी पाहिलन,त्यावरून याला सर्व काहि समजलेलं आहे.अशी खात्रिही पटली..आणि मग मात्र माझी हालत अजुनच खराब झाली. मनात म्हटलं,आलं आता आपलं मरण! आणि काका आता तसाच उभ्या उभ्या सुरु झाला.
काका:- "आत्मारामपंत..अहो कुणापासून दडवता हे सगळं...माझ्यापासून! अरे बालका,गावापासून कैक कोसावर जरी रहायला गेलास ना..तरी तू कोणच्या दिवशी कोण्या रंगाचा शर्ट घालुन बाहेर पडलास घरातून..हे ही सांगेन हो मी तुला.."
मला काकाच्या संघटनेतल्या कामामुळे,त्यानी गावोगाव कोणत्या आणि किती दुर्बिणी लावलेल्या होत्या,याची पूर्ण कल्पना होती. त्यामुळे मी त्याच्यापासून काहि अजुन दडवून ठेवणं शक्यहि नव्हतं..त्याच्या या दोन ओळीतल्या हंटरनी माझ्या मनावर योग्य जागी प्रहार केला, आणि मी त्याला घडलेला सगळा प्रसंग सांगायला सुरवात केली. त्यावर मधेच मला तोडत तो...
काका:- "ते सर्व कळलय मला..,ते जाऊ दे .आता तुला काय वाटतं? ते सांग आधी.
मी:-" मला वाट्तं म्हणजे..मला त्या धनगरानी सांगितलन..तेच पटलं.
काका:-"कोण धनगर हा???"
मी:-"असुरेश्वराच्या देवळाजवळ भेटलेला.." (मग मी त्याला तो सर्व प्रसंग सांगितला..)
काका:-"अरे सज्जन मुला..त्याचा अर्थ तू लगेच त्या पोरिच्या मागे हातात माळ घेऊन हिंडावं, असा होत नाही रे!!!"
मी:-"पण तो चुक काय बोल्ला?"
काका:-"उपदेशकानी चुकिचच बोलायला हवं.असा काहि नियम केलायन का कुणी ? सांग बरं मला?
मी:- "क्ल....."
काका:-"अरे गाढवा..त्यानी तुझ्या समोर माणसाच्या जीवनपद्धतीतलं एक सूत्र मांडलन..पण गणित मांडायची वेळ आली असती,तर त्यानिही तुला विचारलं असतनच ना..कि तु कुठचा कोण? आणि ती पोर कुठची कोण म्हणून?
मी:-"हूं...!"
काका:-" पटणार नाहीच तुला...तुझं वय आणि तूला पहाता अशक्यच आहे ते..पण जर मी तुझं म्हणणं ऐकावं असं तुला वाटत असेल..तर मला एकदा 'लग्न म्हणजे काय?' हे सांग पाहू... आणि शब्दावरून व्याख्या झोडू नकोस..त्या मला तुझ्या पेक्षा अधिक छान येतात. लोकांना विधी सांगतोस,आज मला 'आचार' सांग पाहू.
मी:-...........................
काका:-" गेली ना फिलिम रिकामी... असो.जायचीच ती.. अरे मुला.., तरुण वय हो हे तुमचं. तुला आणि तिलाही वाटत असेल आणखिही एकमेकांविषयी बरच काहि. पण तुझी ही गेल्या तिनचार दिवसातली अवस्था पहाता, एकच सांगतो..हे प्रेम नव्हे..फक्त आकर्षण आहे. "
मी:-"असं कसं रे बोलू शकतोस तू सखारामकाका... ?"
काका:-" ह्हा ह्हा ह्हा...आता तर खात्रिनी सांगतो तुला . मी म्हणतोय तेच खरं आहे. "
मी:- "कशावरून?"
काका:-" ह्हां....वादाला तोंड फुटलं की लगेच ब्याट्री तापते हो तुझी..अरे गाढवा,ज्या मुलिला तू नीट कधी पाहिलं बोललं सुधा नाहिस,आणि तिनिही कदाचित तुला!... त्या मुलिबरोबर घडलेल्या एक दोन प्रसंगावरून आपल्या जीवनाची नाव लगेच निघालास हाकायला?..आणि आधी तुला ती नाव असते,आणि ती सुकाणू/वल्ह्यानी नव्हे..तर मेंदुनी हकायची असते..हे तरी कुठे म्हायत्ये?... सांग..आहे माहिती? "
मी:-" पण मला वाटलं,तुला तरी माझ्या मनातलं खरं कळेल..पण आता तु ही नाहिच म्हणतोस"
काका:-"मुला...मला खरंही कळतं,आणि खोटंही..त्याशिवाय का मी तुझं हे 'पलिकडच्या गावातलं-मित्राचं घरं'..ओळखलं? "
मी:-" .......
..
..
"
काका:-"अहो नाराजेश्वर, तुमचं वय अत्ता कुठे एकविशी पार करतय. त्यात तू नंबर एकचा फिल्मी मांइंडेड..स्वप्नाळू..चार मित्रांनी चेष्टा केली ..आणि तू चढलास लगेच हरभर्याच्या झाडावर. असं झालय तुझं. त्यात तो सज्जन धनगर भेटला..पण त्यानीही दोघांच्या आईबापाना सांगा ..असं सांगितलवतन ना???,,मग ते कसं विसरलास? "
मी:-"पण तुला मी सांगणारच्च होतो ना!!!?"
काका:-" हो...पण सांगितलं नाहिस..आणि आता तूच म्हणतो आहेस,तर माझ्यापासून दडवलस..म्हणजे नक्की-भिती कशाची वाटली तुला. ? काहि कळतय???"
मी:-"......................"
काका:-"जाऊ दे अगम्य आहे तुला हे सगळं...आरे आत्मू..हे वयच नसतं हो ह्या सगळ्या गोष्टी कळण्याचं.या वयात तुझ्यासारखि मुलं अगदी सहज अश्या गोष्टींना भुलतात..मग ती बाइ असो अथवा अन्य काहि."
मी:-" श्श्श्शी...काका.... कसल्या उपमा देतोस रे त्या मुलिवरून???"
काका:-" अस्सं क्काय? ह्या ह्या ह्या!!!... भलताच 'जीव' जडलाय हो अगदी. किती पटकन जखम जाहली एका हळव्या मनाच्या मुलास!...ह्या ह्या ह्या ह्या ह्या!"
मी:- " काकाsssssssssssssssssssssssss"
काका:-" आता मी तुझ्या मनातून त्या मुलिला घालवणारंही नाही..आणि तू तिला -सोड..वगैरे निरर्थक उपदेशंही मी तुला करणार नाही. आता फक्त मी सांगतो ते लक्षपूर्वक ऐक.आणि मग काय घ्यायचा तो निर्णय घे. आत्मू...,लग्न म्हणजे सामान्यतः फक्त बाइ आणि पुरुष एकत्र येणं नव्हे..मग ते तू म्हणतोस तसल्या प्रेमानी असो,किंवा समाजात चालतं,त्या 'रीतीनी' असो. तो काहि, एक अधिक एक बरोबर दोन..असा सोपा हिशेब नव्हे. विवाहाचा खरा अर्थ , एक अधिक एक बरोबर तीनंही असतो..आणि पाचंही असतो.आणि जर का दोन किंवा दहा असे उत्तर मिळत असेल..तर मग तर तो विवाहच नव्हे.तो अविवाहच! तसच तुम्ही मुलं जे, 'भेटू...भेटू..' असं म्हणता ना..ते खरं तर फक्त आकर्षण तुम्हाला ओढून बोलावत असतं....आणि ते ही तुम्हाला अज्जिबात न कळणारं. "
मी:-" पण काका..., ओळख हीच तर विवाहाची पहिली पायरी असते ना??"
काका:- " असं का... तत्व-ज्ञ ? ओळख ही पायरी..., आणि मग गच्ची कोणती?"
मी:-" काका...तू टवाळी का रे उडवतोस ........ .......... .....?"
काका:-"म्हण म्हण..पुढे 'आमच्या निर्मळ प्रेमाची'...वगैरे म्हण. "
मी:- "आंsssssssssssssssss, तुला माझ्या मनातलं कसं रे ऐकू येतं..नेहमी?"
काका:-" अरे मुला ,वर्षाला ही असली दहा तरी प्रकरणं ह्यांडल करतो हो मी संघटनेत! तेंव्हा उडत्या पक्ष्यांची जी मोजायची..ती नै मोजता आली,तरी पिसे मात्र आरामात गिनतो हो मी."
मी:-" ह्हूं....मग आता तूच सांग मी कसा वागू?...मग तुझ्याच निर्णयाप्रमाणे वागेन मी!"
काका:- " मुला..., विवाहा सारखे महत्वाचे निर्णय दुसर्यांच्या नव्हे,तर स्वतःच्या आकलनानी घ्यायचे असतात. आणि त्यासाठी तुमचा तो स्व आहे ना? आत दडून-बसलेला...तो आधी कळावा लागतो. आधी तो ओळखायला शीक...मग कुठच्याही निर्णयाला तुला कुण्णाचिही गरज भासणार नाही..अगदी तुझ्या त्या शांत जागी भेटणार्या देवाचिही!"
...................................................................
कसाबसा तो दिवस पार पडला..आणि एक दिवस आमच्याच इथल्या तालुक्याच्या बाजारात मी आईला घेऊन खरेदीला गेलो असताना..नेमकी ती वैजु,आंम्ही शिरलो त्या दुकानात उभी! मग मात्र परत माझी पहिल्या अवस्थेकडे वाटचाल सुरु झाली. आणि आता तर आइही बरोबर होती.म्हणजे त्यात अजुन बोंब. बोलावं तरी गैरसोय..न बोलावं तरिही. तेव्हढ्यात तिनीच आईला मागच्या मागे येऊन एकदम, "काकु...." अशी हाक मारलीन. मि ही सावधपणानी पलिकडच्या सेल्समनशी गप्पा मारून हा प्र संग टाळायच्या प्रयत्नांना लागलो. पण तिला हे सगळं लक्षात आलच. आणि त्या बयेनी आईशी हसत खिदळत नक्की काय गप्पा मारलन कोण जाणे? निघता निघता.. "काकू...हल्ली तुमच्याकडे काहि जणं एक दोन महिन्यांनी भेटली की ओळख द्यायची बंद-होतात का हो???" असा मला आईअडून दगड मारलन. (
) आईहि तिथे तिच्या मारलेल्या-दगडाला, हसून अनुमोदन देती जाहली. मग
मात्र मी मनात ठाम निश्चय केला. काय वाट्टेल ते होवो..पण हा झोक्याचा खेळ
आता थांबायला हवा. उद्या सरळ तिच्या गावात जाऊन..जिथे ती पहिल्यांदा
भेटेल..तिथे समोरासमोर विचारायचं..की, "बाई गं...तुझं माझं नक्की नातं काय?
ओळख की प्रेम?"
परंतू हा निश्चय मनात होइपर्यंत मी दुकानातून आई बरोबर बाहेर कधी पडलो,आणि गाडीवरून घराकडे येऊ कधी लागलो..हे ही मला कळलेलं नव्हतं.आणि घराच्या जवळपास पोहोचणार एव्हढ्यात मातोश्री सुरु जाहल्या.."आत्मू...त्या वैजुला तुझी बरीच माहिती आहे कि रे. नक्की बात काय आहे? मला सांग हं." हिला ती बया काय काय बोलली याचा अंदाज यावा म्हणून मी आपला सौम्य खडा टाकला. "काहि नाही गं तसं अजुन!" पण शेवटच्या शब्दानी जो गाढवपणा केला,तो पकडला गेलाच लग्गेच. "अजुन??? म्हणजे आधी तुम्ही भेटलायत...थांबव..थांबव ती गाडी..!. मला सांगितलस नाही काहि कसं काय ते???" बोंबला...मला वाटलं होतं..तिच काहि बोलली असेल..पण गाढवासारखं मीच बसलो बोलुन...मग पुन्हा एकदा ती क्यासेट मातोश्रींना ऐकवली..पण सगळं ऐकल्यानंतर आई मात्र एकदम शांत झाली. आणि मग घरी येइपर्यंत आई माझ्याशी जे काहि बोलली ,ते ऐकू जाता...मला म्हणजे गाडी हवेत चालत असल्याचा भास होत होता. मातोश्री:-" हे बघ . मला तिच्या बोलण्यातनं अत्ता जे जाणवतय.ते मी तुला बोलत्ये. नाहितर स्वभावाप्रमाणे एकदम सुतावरुन स्वर्ग गाठशील..हे आधी लक्षात ठेव. पोरगी हुशार आहे एकदम. मी तिला ओळखतेही गेली काहि वर्षं. आमच्या भिशिच्या पैशांचा हिशेब ठेवते ती. शिवाय दर दोन महिन्याला घरी येऊन मला सगळं समजावते,बोलतेही. जवळ जवळ माझच सगळं काम ती करते. पण हे काहिही असलं,तरी तुमचं अत्ता जे काहि चाल्लय..ती एकतर मैत्रि वगैरे नव्हे..सरळ पुढचा टप्पा आहे. यात खरं काय? हे ओळखायचा एकच मार्ग असतो. अशा व्यक्तिला सरळसोट्पणे आणि स्पष्टपणे विचारणे. तेंव्हा एकतर तिला तू विचार..नाहितर आठवड्याभरानी ती येणारच आहे घरी..,तेंव्हा मी विचारेन माझ्या पद्धतिनी. ह्या असल्या गोष्टी लोंबकाळत ठेवणं कुणाच्याही दृष्टिनी बरं नाही. काय समजलास???" मग मी घरी येइपर्यंत गप्प. आणि रात्रिची जेवणं वगैरे झाल्यावर आईला सरळपणे , "ती घरी येइल त्या दिवशी मीच तिला विचारेन" असं सांगुन मी आइचं (आणि माझ्याहि मनाचं..) समाधान करवून घेतलं. आणि शांतपणे झोपि गेलो.
पुढे तो दिवस आला. पण तोपर्यंत माझिही तयारी झालेली होती. आणि यामधे काकाच्या कानमंत्रांचा सगळ्यात मोठ्ठा वाटा होता. मी त्या दिवशीच्या दुकानातल्या प्रसंगामुळे ,तिच्यावर मनातून आलेला रागबिग..शिस्तशीर बाजुला ठेऊन दिला. आणि मनात ठरवलं. प्रश्न तोच विचारायचा..पण फक्त धाडसानी आणि शांत चित्तानी विचारायचा.आणि येइल त्या उत्तरासाठी ठामपणे तयार रहायचं. मन काहिही सांगत असलं,तरी त्याचं ऐकायचं नाही..कारण आपल्याला अजुन ते माहित नाही. ब्बास! इतकिच गोष्ट्,मनात घट्ट धरून ठेवली. आणि माझं ते,काकाच्या म्हणण्यानुसार असलेलं फिल्मी माइंड, एकदम बाजुला पडलं. भयाची जागा विश्वासानी घेतली. हे सगळं आइकडून काकाच्या कानावर गेलेलं होतच. त्याचिही अपेक्षित दाद आली. मी त्या दिवशी दुपारि अंगण्यात सुपार्या सोलत बसलेला असताना..मागुन एकदम काका आला,आणि माझ्या पाठिवर थाप मारत मला.."बेश्ट लक!" असं म्हणुन सायकल दाराशी लाऊन त्याच्यासह आलेल्या संघटनेच्या लोकांबरोबर बोलत बोलत वाडित निघुनहि गेला. ह्या वरुन मी एक ताडलं..कि ज्या अर्थी आता काकाला हे सगळं अत्यंत साधं आणि सरळ वाटतं आहे,त्या अर्थी आपण बरोबर मार्गावर आहोत. आणि मग काहि वेळात ती आली. आईशी बोलायचं ते सगळं बोलली.आणि जायला निघाली..तशी मी तिला अंगणातच. "दोन मिनिटं वेळ आहे का?" अशी सरळ मुद्द्यानीच हाक मारली. मग ती 'हो..' म्हणाल्यावर मी सरळ तिच्यासह मागे वाडीत गेलो.आणि माझ्या विहिरिमागच्या नेहमीच्या अवडत्या जागी..म्हणजे त्या मोडक्या रहाटाच्या टाकलेल्या ओंडक्यावर विसावलो. मग माझ्या पहिल्या प्रश्नाला,तिचा होकार आल्यानंतर ..तिनिहि मला पुढे तिन चार प्रश्न विचारले. आणि मग..दोघांच्याही घरच्यांचा होकार असेल..तर(च) पुढल्या निर्णयाकडे जायचं.असं ठरवून आंम्ही परतलो. जाताना कुठचेही टाटा बाय बाय इत्यादी आमच्यात काहिही घडलं नाही. मला जे वाटत होतं,ते मी बोललेलो होतो.आणि तिला जे वाटत होतं ते ती..! आता पुढचा निर्णय आमचा नसून आमच्या दोघांच्याही घरच्यांचाच होता..हे निश्चित झालेलं असल्यामुळे...मि ही शांत होतो,आणि ति ही निवांत!
मग त्याच दिवशी रात्री, मी आई आणि काकाला आमच्यात झालेलं सर्व बोलणं नीट व्यवस्थित सांगितलं. आणि माझा तिचा एकमेकांना होकार आहे...हे ही सांगितलं. मातोश्रींनी सगळं शांतपणे ऐकलं..आणि मला पुढील महिनाभर शांत रहाण्याचा आदेश करुन्,त्या जात्या जाहल्या. मी मात्र या निर्णयानी काहिसा बुचकळ्यात पडलो.आणि ती गेल्या गेल्या याबद्दल काकाला विचारलं. काकानी मग मला, "अरे आत्म्या, तुझी आईस आहे हो ती. तिला तिचं वासरु रानात हरवतय..की रमतय? त्याचा अंदाज नको का यायला.? अं?????? का....य?. आणि मी असताना तू कशाला चिंता करतोयस एव्हढी?.. अं??? तिनी तिच्या घरी 'पेपर' टाकायच्या आत रिझल्ट आणिन मी! काय समजलास? " यावर पुढे अख्खे दोन आठवडे गेले. पण कुठूनच काहि पत्ता हले ना. मग मात्र मी पुन्हा काहिसा अस्वस्थ व्हायला लागलो. पण एक दिवस तिची आईच सकाळी सकाळी चक्क आमच्या घरी येऊन गेल्याचं मला समजलं. आणि मग मात्र त्यादिवशी मी मनातून अस्सा काहि अस्वस्थ झालो,के ज्याचं नाव ते! आइनी मात्र , काका संध्याकाळी घरी येइपर्यंत मला काहिही कळू देखिल द्यायचं नाही ...या भूमिकेचं अत्यंत ठाम बेअरिंग घेऊन ठेवलं होतन. त्यामुळे माझी अज्जुन वाट . शेवटी ती दुपार टळली,सांजकाळहि जाहली..काका आला..आइचे त्याच्याशी बोलणे जाहले..आणि काकानी मला आई आज्जी यांच्या समोरच आतून हाक दिली... " अहो राजकुमार..या हो आत या! तुमचा रिझल्ट आणलाय. या..!" असं म्हणाला. मी मनात विचार केला, हिची आई तर सकाळीच काय ते सांगुन गेली ना..मग आता काकानी त्यात हा आणखि रिझल्ट कुठनं आणलन? पण सगळी गेम,पूर्ण न-खेळून येइल..,तर तो आमचा काका कसला?
त्याच्याच सांगण्या प्रमाणे..त्याला सकाळि घरी झालेलं बोलणं, आइनी त्याला कळवलन. मग तो दुपारी डायरेक त्यांच्या घरी गेला.. त्यांच्याशी आणि मुख्य म्हणजे तिच्याशी जे विचारायचं/बोलायचं,ते बोलुन (काकाच्याच भाषेत-"झडती करुन"..) मगच तो इकडे आला. आणि मग मला "आत्मू...आहे हो.. जमण्यातलं आहे. तुझं तिचं आणि आपलं त्यांचंही. " यातल्या दुसर्या वाक्याचा अन्वयार्थ मला काहि केल्या समजे ना. मी काकाला काहि विचारणार्,एव्हढ्यात तो मला तसाच बोलत बोलत मागच्या अंगण्यात घेऊन गेला. पण तरिही मी त्याला 'आपलं त्यांचंही!' म्हणजे काय? हा प्रश्न विचारलाच.
काका:- "अरे मेल्या ते घरंही ब्राम्हणाचच असलं,तरी तिची आइस ब्राम्हण नव्हे.!"
मला हे सर्व ऐकताना आधी तो माझा काका 'बोलतो आहे!',यावर विश्वासच बसे ना! मनात म्हटलं, 'हा एकजाती संघटनेचा कार्यकर्ता आणि तोही कृतीशील...तरिहि ह्याला हा प्रश्न पडवा?' पण पुढंचं सर्व ऐकल्यावर मग मात्र मी अजुनंही काकाला पूर्ण ओळखलेलं नाहिये ह्याची मला खात्रिच पटली.
काका:- "आणि जरी तीची आई ब्राम्हण नसली,तरी ती आणि तिची पोर-'कशी असेल?'...असल्या मूर्ख श्रद्धा मी पाळत नाही,आणि आपल्या घरच्यांनाही मी पाळू द्यायचा नाही. काय समजलास? पण तू पडलास भटजी. तिथे गेम आहे रे सगळी! त्यामुळे पहिले तुझ्या धंद्यातल्या लोकांनी तुला स्विकारायला हवे. आणि आजच्या काळात ते ही तुला उघड नाकारायचे नाहीत..याची मलाहि खात्री आहे. पण आपल्या सगळ्याच समाजाकरिता हे स्विकारण्या सारखं आहे काय? की एका भटजीची बायको ही तथाकथित अशी म्हणून! ... हा खरा तो प्रश्न आहे..त्यामुळे तो तपासून पहाणं, हा खरा त्यांच्या घरभेटीतला माझा हेतू होता."
मी:- " मग काय कळलं तुला तिकडे?,आणि काका...आजच्या काळात ह्या असल्या गोष्टींवरून माझं काम बंद पडेल्,असं मला नाहि वाटत.मी ही आता तिनएक वर्ष झाली हे काम करतोय.त्यात मी दहातली दोन लग्ने जी लावतो ती तर सरळ अंतर्जातीय सुद्धा असतात. "
काका:- "हो...पण गाढवा दोनच आहेत अजुन...आठ नव्हे! नै...,आणि कित्तीही आपल्या धर्मशास्त्रांच्या निर्णयानुसार अपत्यास पित्याची जात मिळते..हे खरं असलं..तरी अश्या जागी मात्र ,अजुनंही काहि लोकांना ती मिश्र संतती असल्याचे साक्षात्कार होतात. शेवटी सत्य, हे - आधुनिक मुल्यांनी सामोरं आलेलं असो,किंवा धर्मशास्त्रांनी स्वतःच्या सोयीकरता त्यांची लावुन-दाखवलेली संगती आपल्या समोर ते मांडत असो..ज्या गोष्टीवर लोकांची अज्ञानापोटी ठाम अंधःश्रद्धा असते. तीच्यातले बदल, ते प्रकट्पणे आणि पटकन स्विकारतील..याची खात्री काय? शिवाय जोपर्यंत असल्या (अंधः)श्रद्धा अज्ञानाचा वज्रलेप शिवभस्मासारखा पवित्र मानुन आणि अभिमानानी लेऊन फिरत असतात,तोपर्यंत त्या प्रांतात लढाइच्या पवित्र्यातहि उभे राहुन चालत नाही. अरे गळू काढायला ऑपरेशनच करावं लागतं..,सुरी भोसकुन नै जमत तिथे..आपल्याच-पोटातलं ना ते शेवटी!!! "
मी:-" मला हे कळतय सगळं...पण शेवटी तुला तिथे नक्की समजलं..ते काय???? हे सांग ना?"
काका:-" ह्या ह्या ह्या..आलास मुद्द्यावर! अरे तिची आई जरी ब्राम्हणेतर असली..तरी ती केवळ ह्या मानलेल्या जातिनी. एरवी तिचे आचार अगदी ब्राम्हणकुळांसारखेच आहेत. आणि मी त्या मुलिसंही हे डायरेक ठणकावून सांगितले...म्हटले...'हे बघ ..उद्या तू आमच्या घरी आलीस तर तुला आंम्ही कोणी भटाची बायको,म्हणून पाचवारी/नौवारी'च नेस असली बंधने घालणार नाही. पण चालु जमान्याला आवश्यक असेल..अश्या सर्व गोष्टींनुसार तुला रहावे लागेल..हे ध्यानात घे..आणि मग काय त्या निर्णयाला ये!"
मी:- "मग...काय म्हणाली ती?"
काका:-"अरे..., 'वेळ आली..तर नौवारिही नेसेन..येते मला'हि!' असे कडक उत्तर दिलेन. "
मी:-"बाप रे!!!!!!!!!!!"
काका:-"बाप रे..??? आत्मू...तुझा चेहेरा सांगतोय..कि तुला बरं वाटलय हे उत्तर ऐकुन..माझ्या जवळ हे खोटे आश्चर्य व्यक्त करुन नको दाखवुस! ख्या...ख्या...ख्या...! "
मी:-"काका...... (
) छळू नको ना. शेवटी सांग ना काय झालं ते!"
काका:-" अरे व्हायचं काय आणखिन आता त्यात?...तिच्या आई बापास सगळे बोललो नीट.आणि पुढल्या पौर्णिमेच्या मुहुर्ताला 'बैठकिचे' - सगळे ठरवुन आलो...आता दे बरं मला टाळी!"
=====================================

याची सदस्यत्व घ्या:
पोस्ट (Atom)
आणि याच भागातलं हे गीत (मुरलीधर घनःश्याम सुलोचन..)आपल्या सर्वांना ऐकण्यासाठी लावतो.
<iframe width="640" height="360" src="https://www.youtube.com/embed/LcQOpqMLgqo?feature=player_embedded" frameborder="0" allowfullscreen></iframe>
==========================================================
मी जेंव्हा ही लेखमाला लिहायला घेतली. तेंव्हा असं वाटलं होतं.की ४/५ भागात हे संपेल. फार तर दहा भाग होतील. कारण,त्यावेळी फक्त एक कथानायक निवडून त्याला मध्यवर्ती करून ह्या व्यवसायाचं अंतरंग खुलवावं.यातल्या गमतीजमती सांगाव्या,एव्हढाच माफक उद्देश होता. पण तो ही पूर्ण होता होता,१७ भाग झाले. पुढे काहि लिहिण्याचं माझ्या मनातंही नव्हतं. परंतू एकेदिवशी माझ्या नगरच्या वेदपाठशाळेतल्या,सोलापुरी मित्राचा फोन आला..(ह्ये बेणं मारवाडी ब्राम्हण हाय्,आणि...अट्टल गोडखाऊ आहे येक नंबरच!
तरिही आठरावा भाग लिहिताना त्याच्यापुढे, वेदपाठशाळेचं इतकं संपूर्ण चित्रण घडेल..अशी माझ्या मनाला अजिब्बात कल्पना नव्हती. पण त्या १८ आणि १९व्या भागात,मला जो काहि अतीशय उत्साह वाढवित नेणारा,आणि मनाला आशिर्वाद देणारा प्रतिसाद मिपाकरांकडून मिळाला,त्यातल्या वाक्यावाक्यामुळेच तर मी पुढे इतका लिहित गेलो...
मी ह्या लेखमालेत कोकण हाच प्रांत कसा काय निवडला? आणि मी स्वतः कोकणातल्या एकाही पाठशाळेत शिकलो ,अगर गेलो नसलो,तरी हे चित्रण इतकं चांगलं कसं उमटलं? असा प्रश्न मला इथे व्य.नि.तून..आणि फेसबुकावरील असलेल्या माझ्या काहि क्लायंट्स कडूनंही विचारला गेलेला आहे.. त्याचं उत्तर इतकच की कोकणच्या लाल मातीवर माझं जबरदस्त प्रेम आहे. आजंही मला जर कुणी पुण्यातला व्यवसाय सोडून कुठे जाऊन स्थिरावलेलं अवडेल? असं विचारलं,तर माझ्या नकळत मी कोकणाचं नावं घेइन,इतकी त्या लालमातीची आणि तिथल्या निसर्गाची ,माणसांची माझ्या मनावर गडद दाट छाया पसरलेली आहे. म्हणूनच मला जरं का कुणी देवाचं पर्यायी नाव आजंही विचारलं , तर मी ते कोकण असं सांगतो.